एसटीला फायद्यात आणण्यासाठी अजित पवार यांनी सांगितला प्लॅन, कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत म्हणाले…

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पूर्ण पगार मिळाला नाही. कर्मचाऱ्यांना केवळ ५६ टक्के रक्कम मिळाली आहे. उर्वरित ४४ टक्के रक्कम देण्याबाबत एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या प्रश्नावर अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगाराची माहिती घेतो. परंतु एसटीला शासनाकडून नेहमी मदत दिली जातो. कोरोनाकाळातही एसटी महामंडळाला शासनाकडून २५० ते ३०० कोटी रुपये दिले जात होते. तसेच एसटी मोफत प्रवास योजनेसाठी किंवा इतर विविध सवलतीच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. त्या योजनांचा पैसे शासनाकडून एसटीला दिले जातात, असे अजित पवार यांनी सांगितले.

एसटीच्या आगामी योजनांची माहिती देताना अजित पवार म्हणाले, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ई व्हिईकल घेण्याचा प्रस्ताव आणला आहे. तो मंजूर होणार आहे. देशातील कोणतीही सार्वजिनक प्रवाशी संस्था फायद्याची नसते. परंतु सर्वसामान्यांना किफायतीशी भाड्यात प्रवास करता यावा, यासाठी या संस्था महत्वाच्या असतात. एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांवर चर्चा सुरु आहे. एसटीची जागा अनेक शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे. ती जागा बीओटी तत्वावर देऊन उत्पन्न वाढण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी ६० वर्षांचा करार करण्यात येणार आहे. त्यानंतर तो करार ३० वर्ष वाढवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

मंगेशकर रुग्णालयाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, रुग्णालयाबाबत तिसरा अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आता राज्यात धर्मादाय हॉस्पिटल असेल तर त्याचा उल्लेख सक्तीचे करण्यात येणा आहे. धर्मादाय रुग्णालयात निधी असतो. तो निधी वापरत का नाही? तो निधी पुजेसाठी असतो का? असेही अजित पवार म्हणाले.

महात्मा फुले यांच्या स्मारकाबाबत अजित पवार म्हणाले, फुले वाड्यात चांगले स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. स्मारकाच्या कामात कोणतेही राजकारण आणायचे नाही. याबाबत भुजबळ साहेबांशी मी चर्चा करणार आहे. त्यांना उपोषणास बसण्याची वेळ येणार नाही, अशी काळजी आम्ही घेऊ, असे अजित पवार यांनी म्हटले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)