अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 आमदारांचा रामरामImage Credit source: गुगल
7 MLA Left NCP : नागालँडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व 7 आमदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीत (NDPP) प्रवेश केला. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी ही नागालँडमध्ये मुख्य आणि मोठा विरोधी पक्ष होता. आता हे आमदार सत्ताधारी पक्षात गेल्याने या सरकारला कुठलाही धोका उरलेला नाही.
बातमी अपडेट होत आहे…