आता ज्योतिषाची चर्चाImage Credit source: गुगल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाविषयी मोठे विधान केले. त्यांनी मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिल्याची सल बोलून दाखवली. अजितदादांनी राज्यात उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड केला आहे. भविष्यात हा विक्रम राजकारणात कोणी मोडले याची सुतराम शक्यता नाही. त्यातच दादांच्या मनातील मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आपसूकच कालच्या कार्यक्रमात तोंडी आले. त्यातून चर्चेला उधाण आले. काहींनी संवेदना व्यक्त केल्या तर काहींनी चिमटे काढले. आता शिंदे सेनेचे शिलेदार भरत शेठ गोगावले यांनी सुद्धा त्यांना टोला लगावला आहे.
त्यांनी कोणत्या ज्योतिषाला विचारले?
आळंदी येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांना अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या विधानाविषयी मत विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी दादांना चिमटा काढला. राजकारण आहे. खेळात आणि राजकारणात कधी काही होईल हे सांगता येत नाही. राजकारणात कोण कुठं असेल हे सांगू शकत नाहीत. अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं ते विचारतो, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत रस्सीखेच सुरू आहे. हा वाद ताणल्या गेल्यावर मु्ख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. पण धुसफूस कमी झालेली नाही. 1 मे रोजी मंत्री आदिती तटकरे यांनी ध्वजारोहण केल्यावर त्यावर भरत शेठ यांची प्रतिक्रिया बोलकी होती. त्यांनी पालकमंत्री पदावरचा दावा सोडलेला नाही. तर अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी सूचक वक्तव्य केले. पहिली युती ही भाजप आणि शिवसेना आहे, मग तिसरा आला, असा टोला त्यांनी लगावला. इच्छा व्यक्त करणे चुकीचं नाही. यावर आत्ताच काही सांगू शकत नाहीत, असे ते म्हणाले.
संजय राऊतांवर टीका
संजय राऊत हे सकाळचा भोंगा आहेत. नवनवीन क्लुप्त्या काढत असतात, अशी टीका त्यांनी केली. संजय राऊत यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाहीत, असे ते म्हणाले. संजय राऊत यांचा जय महाराष्ट्र होत आला आहे. आमचा पक्ष हा एकनाथ शिंदे चालवतात. अजित पवारांचं ते स्वतः आणि भाजप हा पक्ष मोदी, अमित शहा चालवतात असे त्यांनी सांगितले.
इंद्रायणी स्वच्छता मोहिम
इंद्रायणी प्रदूषणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. नद्यांच्या काठी लोकसंख्या वाढली सांडपाणी थेट नदी सोडलं जात आहे. इथं दुसरा पर्याय नाही. आम्ही यावर ठोस निर्णय घेऊ. हे करणं कठीण आहे असं वाटत नाही. सर्वांनी बसून यावर उपयोजना करू, तरच सर्व नद्या स्वच्छ होतील, असे ते म्हणाले.