मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेसमोर मांडले आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
कोणाचा परफॉर्मन्स चांगला झालाय हे मुख्यमंत्री यांनी सांगावे, काय नेमके बदल केले आहेत
याच्या पलीकडे काय आहे, नवीन बदल काय आणि त्याने काय बदल घडवले आहेत?
महिला बालविकासचे जर काही क्रेडिट असेल तर ते एकनाथ शिंदे यांना जाईल. कारण त्यांनी १५०० दिले त्यामुळे कंजूम पॉवर वाढली आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे, नाही तर अजगर कधी गिळणार हे त्याना कळणार नाही. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं मला वाटतं. ही अस्तित्वाची लाढई आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर देखील निशाणा साधला आहे. दोन्ही पवार वेगळे नव्हते तेव्हाच सांगितले होते, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
कामगारांच्या अधिकारांबाबत त्यांनी जागृत राहिलं पाहिजे, हे अधिकार कमी होणार नाहीत याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. कामगारांना योग्य मोबदला मिळणं गरजेचं आहे. अलीकडे कामगार चळवळी लुप्त झाल्या आहेत. आता कामगार चळवळ नव्याने उभी राहील, किंवा स्वतः कोणीतरी उभे राहील असं वाटत नाही, असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं आहे.