Ajit Pawar: …तरच काही होऊ शकतं, शरद पवारांसोबत पुन्हा जुळवून घेणार? अजितदादांचं थेट उत्तर

मुंबई: राजकारणात कधी काय होईल, कोण कधी कुठला निर्णय घेईल हे सांगता येत नाही. आज जे चांगले मित्र आहेत ते उद्या एकमेकांचे विरोधत होऊ शकतात, तर जे आज कट्टर विरोधक आहेत ते एकाच मंचावर एकत्रही दिसू शकतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात असंच चित्र पाहायला मिळालं. अजित पवारांनी भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला आणि ते शरद पवरांपासून वेगळे झाले. इतकंच नाही तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हही आता अजितदादा गटाकडे आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोघांनी एकमेकांवर जोरदार हल्लाही केला.

निवडणुकीच्या रिंगणात भलेही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असल्या तरी लढत ही अजित पवार आणि शरद पवारांमध्येच होती. आता पुढील काळात शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील की नाही हा प्रश्न आहे. यावर अजितदादांनी स्वत: स्पष्टीकरण देत सूचक वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

आम्ही जी भूमिका घेतली आहे ती इतरांना योग्य वाटली तर पुढे काही होऊ शकतं, असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. आम्ही ज्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली आहे ती जर त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य वाटली, तर भविष्यात काही गोष्टी घडायच्या की नाही हे काळ ठरवेल, असंही अजित पवार म्हणाले.

त्यामुळे आता भविष्यात जर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र दिसले तर त्यात काही आश्चर्य वाटणार नाही.