अजित पवार, जयंत पाटीलImage Credit source: Facebook
‘टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम’ हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा डायलॉग सर्वश्रृत आहे. याचवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटलांना डिवचलं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येतोय. यासाठी माळशिरसमधील मारकडवाडीत आंदोलन उभं राहिलं आहे. यावर बोलताना अजित पवारांनी जयंत पाटील यांनी डिवचलं आहे. तसंच हिवाळी अधिवेशनावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात भाजप नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी अजित पवारांनी अभिनंदनपर भाषण केलं.
अजित पवारांचा जयंत पाटलांनी टोला
निवडणुकीच्या काळात अनेकजण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे. मग ज्यांच्या हाती संविधान नाही त्यांना आदर नाही का? अनेकांनी संविधानातील तरतुदी वाचल्याच नाहीत. सदस्यांनी स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं क्रमप्राप्त आहे. मग विरोधकांची भूमिका नियम बाह्य नाही का? उगीच काही तरी स्टंटबाजी करायची. कधी तरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असं अजित पवार म्हणाले.
आमची बाजू खरी आहे हे नागपूर अधिवेशनात दाखवून देईल. लोकसभेत आमच्या जागा कमी आल्या तेव्हा आम्ही रडलो नाहीत. 31 जागा आल्या तेव्हा ईव्हीएम गारगार वाटत होतं, आता गार वाटतंय की गरम ते तुमचं तुम्हीच बघा, असं म्हणत ईव्हीएम आरोपांवरून करणाऱ्या विरोधकांवर अजितदादांनी निशाणा साधला आहे.