गव्हाची पोळी खाल्ल्यानंतर पोट दुखतं ? आहारात ‘या’ ग्लूटेन फ्री पदार्थांचा करा समावेश

आपल्या प्रत्येकाच्या घरी जेवणात वरण-भात, पोळी-भाजी हे महत्वाचे अन्नपदार्थ बनवले जातात. या शिवाय तुमचे जेवण अपूर्ण समजले जाते, गव्हाची पोळी हा आपल्या आहारात एक महत्वाचा भाग आहे. ज्याशिवाय अनेकांचे जेवण अपूर्ण राहते. त्यातच गव्हाची पोळी खाल्ल्याने अनेक फायदे देखील मिळतात. पण काहीजणांना गव्हाची पोळी खाल्ल्यानंतर पोटात वेदना किंवा जडपणा जाणवतो तेव्हा त्यांना ग्लूटेन ऍलर्जी किंवा संवेदनशीलतेचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत आहारात ग्लूटेन-फ्री पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःची काळजी घेणे खूप कठीण झाले आहे. अनेक लोकं त्यांच्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊ शकत नाहीत. मात्र तुम्ही दैनंदिन कामांमधून छोटे सकारात्मक बदल करून चांगली जीवनशैली स्वीकारू शकता.

तसेच तुम्ही जे काही खात आहात ते तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणुन घेणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला जर गव्हाची पोळी खाल्ल्यानंतर पोटदुखी होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही आवश्यक बदल करणे आणि ग्लुटेन-फ्री पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला ग्लुटेन-फ्री पदार्थांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. चला जाणुन घेऊयात…

हे ग्लूटेन-फ्री पदार्थ खा

बाजरी आणि ज्वारीची भाकरी:

गव्हाची पोळी खाण्याऐवजी बाजरी आणि ज्वारी हे एक चांगला पर्याय आहेत कारण त्यात ग्लूटेन नसते. त्यांच्या पोळ्या हलक्या आणि सहज पचणाऱ्या असतात. तसेच, त्यामध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर असतात, जे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

तांदूळ आणि त्याचे पदार्थ:

तांदळाच्या पीठापासुन तयार केलेली भाकरी, पोहे आणि इडली-डोसा यांसारखे पदार्थ पोटाला हलके असतात आणि पचायला देखील सोपे असतात. जर तुम्हाला गव्हाच्या पोळ्या खाल्ल्याने त्रास होत असेल तर तुमच्या आहारात तांदळांपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करा.

मसूर आणि बेसन:

बेसन आणि इतर डाळींपासून बनवलेले पीठ हे देखील एक चांगला पर्याय आहे. त्यापासून बनवलेले पदार्थ पोटासाठी पचनास खुप हलके असतात आणि त्यात प्रथिनेही भरपूर असतात. तुम्ही बेसनाचा पोळा, चिल्ला किंवा पकोडे बनवून खाऊ शकता.

मक्याचे पीठ आणि नाचणीचे पीठ:

मक्याचे पीठ आणि नाचणी यामध्ये ग्लूटेन नसते. मक्याच्या पिठापासुन किंवा नाचणीच्या पीठापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे हाडांसाठी चांगले असते. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही मक्याची रोटी खाणे देखील आरोग्यदायी असते.

क्विनोआ आणि ओट्स:

तुम्हाला जर गव्हाच्या पोळीची अ‍ॅलर्जी असेल तर क्विनोआ आणि ओट्स हे देखील चांगले पर्याय आहेत. यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर असतात आणि पोटासाठी हलके असतात. त्यामुळे तुमच्या आहारात ग्लूटेन-फ्री पदार्थांचा समावेश केला जाऊ शकतो.

ग्लूटेन फ्री पदार्थ का खावेत?

ग्लूटेन फ्री पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या कमी होतातच, शिवाय पोटात सूज, वेदना आणि जडपणा देखील टाळता येते, ग्लूटेन फ्री पदार्थांचे सेवन केल्यास पचन क्रिया सुधारते आणि आम्लपित्तची समस्या देखील कमी होते. ग्लूटेन-फ्री आहार घेतल्याने शरीरातील ऊर्जा वाढते कारण ते हलके अन्न आहे आणि सहज पचते. हे त्वचा निरोगी ठेवते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकते. ज्यांना सीलिएक डिजीज किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम आहे त्यांच्यासाठी हा आहार विशेषतः फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)