Accuse Dattatray Gade : आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करणार

स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. लष्कर पोलीस गाडे याला घेऊन कोर्टाकडे रवाना झालेले आहेत.

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर या घटनेवर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात होता. अखेर मध्यरात्री पोलिसांना आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात यश आलं आहे. आज त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यासाठी लष्कर पोलीस गाडे याला घेऊन कोर्टाच्या दिशेने रवाना झालेले आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)