‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा..’, एकनाथ शिंदे जालन्यातून कडाडले , उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  तुम्ही 97 जागा लढवल्या आणि 20 निवडून आल्या आम्हीं 80 लढविल्या आणि 60 जागा  निवडून आल्या, मग सांगा खरी शिवसेना कोणाची असा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.  काही लोकांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती.  धनुष्यबाण यांनी गहाण ठेवला होता, बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण पेलण्याची ताकद एकनाथ शिंदेंमध्ये आहे, असा घणाघात यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

तुम्ही 97 जागा लढवल्या आणि 20 निवडून आल्या आम्हीं 80 लढविल्या आणि 60 जागा  निवडून आल्या, मग सांगा खरी शिवसेना कोणाची? काही लोकांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती.  धनुष्यबाण यांनी गहाण ठेवला होता, बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण पेलण्याची ताकद एकनाथ शिंदेंमध्ये आहे. काही लोकांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती, म्हणून 2 वर्षांपूर्वी आम्ही उठव केला. आता हे रडायला लागले आहेत. नवनवीन आरोप करायला लागले आहेत, माझं हे चोरलं ते चोरलं. घरात बसून निवडणुका नाही लढवता येत, असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  जर आमची सत्ता आली नसती तर लाडकी बहीण ही योजना आली नसती. ही योजना हिट नाही तर सुपरहिट झाली. ज्यांनी खोडा घातला त्यांना लाडक्या बहिणींनी चांगलाच जोडा दाखवला. ही योजना बंद होणार नाही,  विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली तरी मी सांगतो ही योजना बंद होणार नाही. विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले, पण त्यांना कोर्टाना हुसकावून लावलं, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तुम्ही लढा मी कपडे सांभाळतो असे नको. घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही. एवढे शिवसैनिक का येत आहे. तिकडे मालक नी नोकर ,  मात्र इथे कुणी मालक नोकर नाही. इथे सर्व शिवसैनिक आहेत. अब  राजा का बेटा राज नहीं बनेगा, मला सर्वांनी सांगितले श्रीकांतला मंत्री बनवा मात्र आपण प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्री बनवले असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)