वीज तोडणीसाठी महावितरणची ८० कर्मचाऱ्यांची टीम आली, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना माघारी पाठवलं

Authored by: मानसी देवकरContributed by: स्वप्निल एरंडोलीकर |Maharashtra Times

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सांगलीतल्या शेतकऱ्यांनी पळवून लावलंय. सांगलीतील वाळवा तालुक्यात असलेल्या धोत्रेवाडी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा महावितरणकडून प्रयत्न करण्यात आला. पण शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र महावितरणचा हा प्रयत्न हाणून पाडला. एकूण बारा कनेक्शन तोडण्याच्या उद्देशाने महावितरणचे दहा अधिकारी आणि 80 कर्मचारी धोत्रेवाडी गावात दाखल झाले होते. धोत्रेवाडी गावातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना पळवून लावले. तर तोडलेल्या तीन कनेक्शनची शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केतन जाधव यांनी स्वतः पुनर्जोडणी करून दिली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)