दिवसभराच्या धावपळीत काही मिनिटांच्या ‘पॉवर नॅप’चे शरीराला होतात अनेक फायदे

तुम्हाला दिवसभर काम करताना प्रचंड थकायला होते आणि तुमची एकाग्रता कमी होतेय असे वाटत असेल तर तुम्ही दिवसा थोडी डुलकी काढू शकता. काही जण दुपारचे एक- दोन तास झोपत असतात. परंतू त्याऐवजी कामातून ब्रेक घेऊन तर काही मिनिटांची डुलकी काढली तरी तुम्हाला जास्त फायदेशीर होऊ शकते. दिवसाचा पॉवर नॅप घेणे हा थकवा दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.तो तुमच्या मेंदू आणि शरीर दोन्हींसाठी फायदेशीर आहे. का ते पाहूयात….

पॉवर नॅप घेणे कसे फायदेशीर –

मेमरी चांगली होते – दिवसाचा नॅप घेतल्याने तुमची स्मृती चांगली होती. ही तुमच्या मेंदूत नवीन माहिती चांगल्या प्रकारे स्टोअर करण्यास मदत करते

एकाग्रता वाढते – थोडा वेळ पॉवर नॅप घेतल्याने एकाग्रता वाढते. यामुळे तुम्ही तुमच्या कामावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रीत करु शकता.

क्रिएटीव्हीटीत वाढ – दिवसा नॅप घेतल्याने तुमच्या क्रिएटीव्हीटीत वाढ होते. तुमच्या मेंदूला नवीन विचार करण्यास मदत मिळते.

तणाव कमी होतो – दिवसा नॅप घेतल्याने तुमचा मूड चांगला होतो.तुम्ही जास्त एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह होता.

शिकण्याच्या क्षमतेत वाढ – दिवसा नॅप घेतल्याने आपल्या शिकण्याच्या क्षमतेत वाढ होते. तुमच्या मेंदूला नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करते.

शरीरासाठी काय फायदे ?

ऊर्जा वाढते – दिवसा नॅप घेतल्याने तुमच्या एनर्जीचा स्तर वाढतो. तुम्हा कोणाताही थकवा जाणवत नाही आणि संपूर्ण दिवस काम करताना ऊर्जा वाढते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते – दिवसा नॅप घेतल्याने तुमची इम्युनिटी वाढते.हे तुम्हाला आजारापासून वाचविण्यास मदत करते.

हृदयाच्या आरोग्यात सुधारणा – दिवसाचा काही मिनिटे डुलकी काढली की तुमच्या हृदयाला देखील चांगले असते. हे तुमच्या ब्लड प्रेशरला कमी करण्यास मदत करते.

दिवसा किती वेळ नॅप घेतली पाहीजे ?

तुम्हाला दिवसाचे २० ते ३० मिनिटे डुलकी काढायला हरकत नाही. जर तुम्ही यापेक्षा जास्तवेळ झोपला तर तुम्हाला उठल्यानंतर थकल्यासारखे वाटेल.

( Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा )

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)