पुण्यामधून खळबळजनक घटना समोर आली आहे, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून फरार आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून एक लाखांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच डॉग स्कॉडच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे. ड्रोन कॅमेरा आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं उसाच्या शेतात आरोपीचा शोध सुरू आहे. पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाकडून आरोपीचा शोध घेतल्या जात आहे.
पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल समोर
दरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली, तक्रार दाखल झाल्यानंतर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, ससून रुग्णालयाकडून पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणीवर दोनदा अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून, पोलिसांकडून आता ड्रोन कॅमरा आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं उसाच्या शेतात त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच त्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक लाखांचं बक्षिस देखील जाहीर करण्यात आलं आहे.
शिवसेना ठाकरे गट आक्रमक
पुण्यातील या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून स्वारगेट बस स्थानकात तोडफोड करण्यात आली. सुरक्षा रक्षकांची कॅबीन फोडण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा बसमध्ये हा प्रकार घडला तेव्हा ती बस सुरक्षा रक्षकाच्या कॅबीनसमोर उभा होती, मग हा प्रकार त्यांच्या कसा लक्षात आला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे सर्व त्यांच्या संमतीनं सुरू आहे का? असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.