दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मित्राने त्याचाच काटा काढला,घटनेमुळे सांगलीत खळबळ

Crime News : दोन भावा भावांमध्ये काही कारणांवरून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार, सांगली जिल्ह्यातील बाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला.

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : दोन भावा भावांमध्ये काही कारणांवरून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार, सांगली जिल्ह्यातील बाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला. सचिन सुभाष लोंढे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून सचिनचा छातीत चाकू भोसकून खून झाला आहे.

संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावा भावांत भांडण सुरू असताना सचिन भांडण सोडवायला गेला असताना हा खून झाला. या खूनप्रकरणी संग्राम कमलाकर शिंदे या तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शरद शिंदे हे दोन भाऊ पेठ येथे वास्तव्यास आहेत. या दोघांच्या शेजारीच सचिन लोंढे यांचे घर असून हे तिघे मित्र आहेत. शिंदे भावामध्ये सतत काही ना काही कारणावरुन वाद होत असत. त्यावेळी सचिन हा शरद व संग्राम यांच्यामधील भांडणात मध्यस्थी करत होता.

मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सचिन लोंढे व त्याचे मित्र विश्वजीत शिंदे, शाकिर शिंदे, ऋषिकेश बारे हे भीमनगर परिसरात उभे होते. तेथून शरद शिंदे व संग्राम यांची बहिण मयुरी हे दोघे त्यांच्या घरी निघाले होते. त्यावेळी संग्राम शिंदे हा दुचाकीवरून हातामध्ये चाकू घेवून तेथे गेला. संग्राम व शरद यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर, दोघांत शिवीगाळी सुरू झाली. शरद व संग्राम यांच्यात जोरात भांडण सुरू झाले. त्यावेळी तेथे असलेला सचिन हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला. मात्र, संग्रामने, तू आमच्या भांडणामध्ये यायचे नाही, असे म्हणून हातातील चाकू सचिनच्या छातीत खुपसला.

या घावामुळे सचिन जोरजोराने ओरडला, चाकूचा घाव वर्मी लागल्याने तो खाली पडला. त्याच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावदेखील झाला. सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून संग्रामने तेथून पळ काढला. दरम्यान, तेथील मित्रांनी जखमी सचिनला इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

स्वप्निल एरंडोलीकर

लेखकाबद्दलस्वप्निल एरंडोलीकर सहारा समय मुंबईसाठी सांगलीत व्हिडिओ पत्रकार म्हणून २००९ ते २०११ या कालावधीत ३ वर्षांसाठी काम केले आहे. सांगली शहर जिल्हा रिपोर्टर म्हणून सी न्यूज चॅनेलसाठी २०१३ ते २०१९ पर्यंत काम केले आहे. जिल्हा वार्ताहर सांगली म्हणून एएम न्यूज चॅनेलसाठी २०१९ते २०२१ पर्यंत काम केले आहे. न्यूज 18 लोकमत (नेटवर्क18) स्ट्रिंगर म्हणून सांगली जिल्ह्यासाठी २०१२ ते ऑक्टो 2022-पर्यंत काम केले आहे. आता महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनसाठी जानेवारी २०२३-पासून कार्यरत आहे.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)