मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी गुडन्यूज, महिन्याभरात होणार नवा बदल

 Mumbai Local Trains Update : मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या मुंबई लोकलने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यात उशिरा येणाऱ्या ट्रेन, मर्यादित लोकल, लोकल डब्ब्यांची संख्या आणि सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा सतत खोळंबा होतो. तसेच आता मध्य रेल्वेची स्थिती ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. पण आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने एक गुडन्यूज दिली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता लवकरच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लोकलच्या स्थानकाबद्दलची अचूक माहिती मोबाईलद्वारे समजणार आहे. लोकलची अचूक वेळ काय, सध्या ती कोणत्या स्थानकात आहे, लोकल किती वेळात प्लॅटफॉर्मवर येईल यांसह अनेक महत्त्वाची माहिती मध्य रेल्वेकडून दिली जाणार आहे. येत्या महिन्याभरात ही नवीन सुविधा सुरु केली जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

येत्या महिन्याभरात ही यंत्रणा सुरु होणार

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता लवकरच मध्य रेल्वेची लोकल प्लॅटफॉर्मवर किती वेळात येणार याची माहिती प्रवाशांना समजणार आहे. मध्य रेल्वेकडून एम इंडिकेटरवर येत्या महिन्याभरात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी ग्वाही मध्य रेल्वेने दिली आहे. सध्या प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी येण्याचा अपेक्षित कालावधी समजण्यासाठी इंडिकेटरवर तशी व्यवस्था आहे. तर पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्म्सवर ही यंत्रणा सुरू आहे. मात्र, मध्य रेल्वेवर ही यंत्रणा अद्यापही सुरू झालेली नाही. आता येत्या महिन्याभरात ही यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दररोज प्रवास करणाऱ्यांना दिलासा

पश्चिम रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांना लोकल येण्याच्या वेळेची अचूक माहिती मिळावी, यासाठी पश्चिम रेल्वेने २००२ मध्ये ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टिम (टीएमएस) यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्यानुसार आयपी आधारित तंत्रज्ञान वापरून प्लॅटफॉर्मवर ट्रेन येण्याचा अपेक्षित कालावधी दाखवला जातो. यानंतर मध्य रेल्वेनेसुद्धा टीएमएस यंत्रणा २००८ मध्ये उभारली. परंतु यामध्ये लोकल किती वेळात प्लॅटफॉर्मवर येणार यासाठीचे अद्यावत आयपी तंत्रज्ञान बसवण्यात आले नाही. गेल्यावर्षी ही अशा पद्धतीची यंत्रणा बसवण्यात यावी, अशी घोषणा मध्य रेल्वेने केली होती, मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. आता मात्र लवकरच ही सेवा सुरु केली जाणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेद्वारे दररोज प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)