Sindhudurg Tarkarli Beach: मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले पुणे येथील पाच पर्यटक बुडाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तिघेजण बचावले आहे, त्यांची प्रकृती गंभीर आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील शुभम सोनवणे आणि रोहित कोळी यांचा मृत्यू झाला.
वीकेंडच्या निमित्ताने कोकणात पुन्हा एकदा पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांचा सर्वाधिक कल हा तारकर्ली देवबाग या भागात पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा पर्यटन मोठी गर्दी होत आहे. याच ठिकाणी पुणे येथील पर्यटक आले होते. ते आंघोळीसाठी समुद्रात जात होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना खबरदारी घेत जाण्याचा सल्ला दिला. परंतु अतिआत्मविश्वास दाखवत हे पर्यटक खोल समुद्रात गेले. त्यात पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. त्यानंतर स्थानिक लोकांनी बचावासाठी धाव घेतली. परंतु समुद्राच्या लाटांमध्ये बुडाल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
या दोघांचा मृत्यू
रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (वय २२) या दोघांचा पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला आहे. हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय २४) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
समुद्र किनारी जाताना काळजी घेण्याची गरज
पुण्यातील पर्यटकांना पोहता येत होते. त्यानंतर ते पाण्यात बुडाले. पाण्याची खाली आणि वेग नवीन लोकांना माहीत नसतो. यामुळे पाण्याजवळ जाताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. स्थानिक लोकांनी दिलेले सल्ले ऐकून घेतले पाहिजे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. पर्यटनाचा आनंद क्षणात नाहीसा होतो.