अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही
शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन केली आणि महाराष्ट्रात तेव्हापासूनच जातीयवादाला सुरूवात झाली, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला. त्याचवेळी शरद पवार यांच्यासोबत राहूनही अजित पवार यांनी जातीपातीचे राजकारण केले नाही, असे प्रमाणपत्र राज यांनी अजितदादांना दिले.
राम गणेश गडकरी कोण तर काहींना वाटायचे नितीन गडकरी यांचे पाहुणे आहेत
पुण्यातील संभाजी बागेमध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा पुतळा फोडण्यात आला. राम गणेश गडकरी कोण आहे, हे अनेकांना माहितीही नव्हते. काहींना नितीन गडकरी यांचे पाहुणे आहेत, असे वाटायचे, असेही मिश्किलपणे राज म्हणाले.
मुस्लीम जर काँग्रेससाठी फतके वाढत असतील तर….
काँग्रेससाठी तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी जर मशिदीतून फतवे निघत असतील तर आज हिंदू म्हणून मी तुम्हाला सांगतो, मुरलीधर मोहोळ आणि शिंदे-अजित पवारांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन राज यांनी केले.