Shyam Manav: मग त्यावेळी जनसंघाची सुपारी घेतली होती काय? श्याम मानव यांचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर
नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, “श्याम मानव मला अनेक वर्षांपासून ओळखतो. खोटा निगेटिव्ह सेट करण्यासाठी बोलल्या जात आहे. माझ्यावर एवढा मोठा आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला हवे होते.यावर बोलतांना श्याम मानव म्हणाले, मी सार्वजनिक जीवनात 1970 सालापासून आहे 14 वर्ष यशस्वी पत्रकारिता केली आहे. गेली 14 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करत आहे. त्यामुळे एखादी माणसाने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली त्यावर कितपत विश्वास ठेवावे, कितपत नाही, कोणते पुरावे पहावे आणि कोणते नाही या सगळ्या गोष्टी मला नीट माहिती आहे. माझी क्रेडीबिलिटी अत्यंत महत्त्वाची आहे. मी आयुष्यात कधी खोटे बोलत नाही. कधी खोटी मांडणी करत नाही. आणि हे बोलण्याचा आधीच मी या गोष्टींचा विचार केलेला आहे. मी हे पहिल्यांदा नाही बोललो गेल्या जानेवारीपासूनही मी हे बोलत आहे.

मी महाराष्ट्रात दोन माणसांबद्दल नेहमी बोलत आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना कशा पद्धतीने ईडीच्या माध्यमातून यांच्यावर दबाव आणला जात आहे. पुढे बोलताना श्याम मानव म्हणाले, कुणीतरी मला सुपारी देईल आणि मी तसा वागेल, असा देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचे आहे? त्यांनी ते जाहीररीत्या म्हणावे. खरं म्हणजे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये चांगली आहे. विकत घ्यायची क्षमता त्यांच्यामध्ये जास्त चांगली आहे. मला कोणी विकत घेऊ शकत का..? सुपारी देऊ शकता का..? माझ्या संपूर्ण जीवन लोकांच्या समोर आहे. मी महाविकास आघाडीची सुपारी घेतलेली नाही. ज्या वेळेस मी इंदिरा गांधींच्या विरोध करत होतो मग त्यावेळी जनसंघाची सुपारी घेतली होती काय ?असेही श्याम मानव म्हणाले.

एकीकडे इंदिरा गांधींच्या आणिबाणीला विरोध करण्यासाठी मी जेलमध्ये गेलो. त्यावेळी हेच लोक माझ्यासोबत होते जनसंघ आणि आरएसएसचे लोक माझ्यासोबत होते, जेलमधून सुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत मी काम केले आहे. त्यांना कौतुक होतं मी विद्यार्थी असताना सुद्धा इमर्जन्सीच्या विरोधात जेलमध्ये गेलो आणि त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आपल्याला अत्यंत समान देणाऱ्या मोकळ्या मनाच्या माणसाचा मित्राचा मुलगा आहे. हा सम्मान नेहमी राहिलेला आहे. त्यामुळे या विषया या विषयावर मी विचार करून बोलत आहे आणि माझ्या विचारावर मी ठाम आहे, असे श्याम मानव म्हणाले.