शिर्डी : वार्ताहर
शिर्डीतील साईनाथ रुग्णालयाच्या कचराकुंडीत एक पाच तासापुर्वी जन्मलेले मृत स्त्री जातीचे अभ्रक आढळल्याने शिर्डीसह पंचक्रोशीत आढळून आले असून अज्ञाताविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी साई बाबा संस्थनच्या रूग्णालयाशी सलग्न नसलेला दावा प्रशासनाने केला आहे. मात्र साई बाबांच्या शिर्डीसह पंचक्रोशित खळबळ उडाली आहे.
शिर्डीतील साईनाथ रुग्णालयाच्या परीसरात असणा-या कचराकुंडीत काल (दि.२३) रोजी सायं. ६ ते रात्री १० वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाच तासापूर्वी मृत पावलेले अभ्रक आणून टाकले होते. कचरा कुंडी साफ करण्यासाठी गेले असलेल्या सफाई कर्मचा-याला आढळले. त्या कर्मचा-यांने समंधीत अधिका-यांच्या कानावर टाकल्यानंतर त्यांनी कायदेशिर शिर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून या क्षेत्रात येणारे सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलिस करत आहे.
या बाबत प्रसारमाध्यमांशी बोलतांना साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, साईनाथ रूग्णालयात एक महीलेची प्रसुती झाली असून तिचे अर्भक आणि ती दोघेही सुखरुप आहे. मात्र या महीलेचा या घटनेशी काही संमंध नाही. कोणीतरी बाहेरील अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असावे, या बाबत संस्थानकडे असणारे सर्व सिसिटीव्हीचे चित्रण पहाण्याचे काम चालू आहे. नवजात शिशु कोणी टाकले हे आजून स्पष्ट झालेले नाही. मात्र शिर्डीत सर्वत्र खळबळ माजली आहे.