व्यवस्थापनाचा संबंध नाही?
एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत केले जाते. एम्प्रेस गार्डन ही वनस्पती शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. दररोज अनेक वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत असतात. अज्ञात व्यक्तीने ‘ब्लाइंड डेट’ आणि ‘स्टार्ट अ डेट’ नावाने कार्यक्रम आयोजित केल्याचे जाहीर करून तिकीट विक्री सुरू केली आहे. व्यवस्थापनाचा या कार्यक्रमाशी दुरान्वये संबंध नसून, या अशा जाहिरातीमुळे एम्प्रेस गार्डनची जनमानसात बदनामी होत आहे, अशी तक्रार एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनाने वानवडी पोलिस ठाण्यात केली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
फुले उद्यानातही इव्हेंट
वाकड परिसरात वाकड-भोसरी बीआरटी मार्गालगतच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात ‘भेटा आणि मिसळा’ नावाचा डेटिंग इव्हेंट येत्या शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटसाठीही पुरुषांना आठशे रुपये आणि महिलांना शंभर रुपये तिकीट आहे.
नेमके काय घडणार?
कोरेगाव पार्क येथील एका मॉलमध्ये ‘स्पीड डेटिंग’ नावाचा इव्हेंट आयोजित केला आहे. येत्या शनिवारी हा इव्हेंट होणार आहे. याची जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तिकीट बुकिंग अॅपमध्ये या इव्हेंटसाठी दर्शविण्यात आलेला फोटो आक्षेपार्ह आहे. आयोजकांनी दर्शविलेल्या फोटोवरून हा केवळ चर्चेचा इव्हेंट नसून, तेथे नेमके काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
इव्हेंट नेमका कशासाठी?
गप्पा, विचारांची आदान-प्रदान, पुस्तकांविषयी चर्चा आणि नवीन मित्र बनवणे हा या ‘डेटिंग इव्हेंट’चा हेतू असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, इव्हेंटच्या जाहिरातीसाठी दर्शवलेल्या फोटोंमुळे आणि काही ‘विशेष’ सूचनांमुळे या इव्हेंटचा नेमका हेतू काय आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
ठळक मुद्दे
– इंग्रजी, हिंदी, कन्नड, बंगाली, मल्याळम् भाषिकांनाच प्रवेश.
– एकाही इव्हेंटमध्ये मराठी भाषिकांना प्रवेश असल्याचा उल्लेख नाही.
– महिला आणि पुरुषांची संख्या समसमान राखण्यात येणार.
– नवीन मैत्री, व्यावसायिक जोडणी (कनेक्शन) किंवा आणखी कशाच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी हे इव्हेंट उपयुक्त असल्याचा दावा.