Supriya Sule : प्रेमाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्हही दिलं असतं, ‘लाडक्या बहिणी’चा दादांना ‘मेसेज’

सातारा, संतोष शिराळे : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचा भव्य महिला मेळावा घेण्यात आला होता. मेळाव्यात संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पक्षफुटीच्या घटनेवर लक्ष वेधले तसेच अजित पवार गटाला सुप्रिया सुळेंनी खडेबोल सुनावले. तसेच शिंदे सरकारवर सुद्धा सुप्रिया सुळेंनी थेट निशाणा साधला. माझा माझ्या पांडुरंगावर श्रद्धा आहे असे म्हणत सुळेंनी सरकारवर निशाणा साधला.

शिंदे सरकारला प्रभू श्रीरामाचे नाव घेण्याचा काही अधिकार नाही असे सुळे म्हणाल्या, रामाचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना आहे, ज्यांनी आयुष्यात मर्यादा ठेवल्यात, पण या सरकारने कुठलीच मर्यादा ठेवली नाही असे म्हणत सुप्रिया सुळेंनी पुन्हा शिंदेंवर हल्लाबोल चढवला, साताऱ्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा सुळेंनी सरकावर टीका केली. भ्रष्टाचार होत असल्याने महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड अडचणीत महाराष्ट्रातील मायबाप जनता आली आहे असे विधान सुळेंनी केले होते.
खासदार ‘लाडक्या बहिणीचा प्रश्न’, संतापले आमदार ‘दादा’, नियोजन बैठकीत निधीवरून पवारांसमोर वातावरण तापले

लोकसभेत आम्ही जिंकायला हवे होते पण दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारी यांच्यामध्ये आमचे खूप नुकसान झाले,कदाचित दुसरी तुतारी नसती, तर आज आमचा नऊ सीट लोकसभेवर निवडून आले असते पण रडीचा डाव असे म्हणत भाजपावर सुळेंनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर पुढे अजित पवारांबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, ” मागितले असते ना तर पक्ष चिन्ह काय सगळे देऊन टाकले असत, एकदा प्रेमाने मागून तरी बघितलं असतं, कधीच लढले नसते असा सरळ सुळेंनी बोलून दाखवले.

लाडक्या बहिणीचा लाडक्या भावाना थेट संदेश

पुढे महिला मेळाव्यात बोलताना सुळे म्हणाल्या.. “कशासाठी लढायचे ! काय निष्पन्न होते भांडणातून, काय निष्पन्न होत नाही, त्यातून फक्त कुटुता निर्माण होते. मला सांगितले असते, पक्ष, चिन्ह पाहिजे आहे. दिले असते. शून्यातून आयुष्य सुरू केले असत. आई-वडिलांनी शिकवलं कशाला? जर अडचणीच्या काळात आई-वडिलांसोबत उभे राहायचे नाही तर मग कधी उभे राहायचे?” असे म्हणत सुळेंनी थेट वहिनी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांना टोला लगावला.