Chandrahar Patil : चंद्रहार पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात? सांगलीत दोन जागा ठाकरे गट लढवणार, नावेही सांगितली

सांगली : 2024 लोकसभा निवडणुक पार पडली असून सर्वांनाच विधानसभेचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू असून मतदारसंघांवर दावे प्रतीदावे करण्यास सुरवात झाली आहे. अशातच शिवसेना (उबाठा) पक्ष सांगलीतून दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे. आज गुरुपौर्णिमा निमित्त चंद्रहार पाटील यांनी शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली.

मिरज आणि आटपाडी या दोन जागा लढवणार

चंद्रहार पाटील यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ”कोणत्याही मैदानात गेलो तरी आपलं काम प्रामाणिकपणे केलं की यश नक्की मिळत असतं. सांगलीमधून शिवसेना ठाकरे गट मिरज आणि आटपाडी या दोन जागा लढवणार आहे”.

आदेश दिला तर विचार करेन

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले चंद्रहार पाटील पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर चंद्रहार पाटील यांनी उत्तर दिले की, ”पक्षाने मला जर काही आदेश दिला तर मी नक्कीच विचार करेन”.
Dharmaveer 2: धर्मवीर २ चा एक डायलॉग नेटीझन्सचा लॉजिकल सवाल, मविआ सरकार स्थापनेवेळी दिघे साहेब होते का?

बाळासाहेब हिंदुत्वाचे गुरु होते

खासदार संजय राऊत यांनी गुरुपौर्णिमेवरून शिंदे गटाला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ”एक गुरू आपल्या आयुष्यात आसायला हवा. शिवसेनाप्रमुख यांनी आम्हाला शहाणपण शिकवलं योग्यवेळी मार्गदर्शन केलं. माणसांची घडवणूक आणि जपणूक केली. म्हणून आज आमच्यासारखे लोक निष्ठेने दिसत आहेत. बाळसाहेब महाराष्ट्राचे गुरू होते. ते हिंदुत्वाचे गुरु होते. परंतु त्यातून काही नासके आंबे बाहेर गेले. त्यांनी बाळासाहेबांचे फोटो लावू नयेत”.

सिनेमे काढले तर तोंड झाकून फिरावं लागेल

धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ”आम्ही दिघे साहेबांना अधिक जास्त ओळखतो. जर सिनेमे काढले तर त्यांना तोंड झाकून फिरावे लागेल. बेईमान लोक दिघे साहेबांना गुरु मानत असतील तर हा खोटं चित्र उभं करत असतील तर हा दिघे साहेबांचा अपमान आहे”.