मुंबई: लोकसभा निवडणुकीत घसरगुंडी उडाल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेला जागावाटप रखडल्याचा फटका महायुतीला बसला. ती चूक विधानसभेला टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. जागावाटप लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महायुतीत हालचाली सुरु आहेत. भाजप १५५ ते १६० जागा लढवण्याच्या विचारात आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत १५५ च्या खाली येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ८० ते ९० जागा आणि शिंदेसेना १०० जागांसाठी आग्रही असल्यानं जागावाटपावेळी लोकसभेसारखीच रस्सीखेच पाहायला मिळू शकते.
राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यापैकी १५५ ते १६० जागांसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे शिंदेसेना, अजित पवार गट आणि अन्य लहान पक्षांना १२८ ते १३३ जागा मिळतील. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं ही माहिती दिल्याचं ‘लोकमत’नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. सध्याच्या घडीला विधानसभेत भाजपचे १०५ आमदार आहेत. काही अन्य आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. हा आकडा ११५ वर जातो. शिवसेनेचे ५६ उमेदवार निवडून आले. त्यातील ४० जण एकनाथ शिंदेंसोबत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ उमेदवार निवडून आले. पैकी ३९ आमदार अजित पवारांसोबत आहेत.
विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षांना मिळाव्यात, असा दावा तिन्ही पक्षांतील आमदारांचा आहे. त्या जागांवरील विद्यमान आमदारांनाच संधी द्यायची की दुसऱ्याला तिकीट द्यायचं हा निर्णय त्या पक्षाचा असेल. पण राज्य भाजपच्या नेत्यांची जागावाटपातील आकड्याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. १६० च्या खाली एकही कमी जागा लढवायची नाही, अशी भूमिका दिल्लीतील नेत्यांना कळवण्यात आलेली आहे.

लोकसभेला महायुतीत सर्वाधिक स्ट्राईक रेट राखून ७ जागा जिंकणाऱ्या शिंदेसेनेला १०० जागा हव्या आहेत. पण त्यांना ८० ते ९० जागा देण्यात येतील. उर्वरित जागा अजित पवार गट आणि घटक पक्षांना सोडण्यात येतील. आम्हाला ७० पेक्षा एकही जागा कमी चालणार नाही अशी भूमिका अजित पवार गटानं घेतली आहे. लोकसभेला कमी जागा घेतल्या. आता विधानसभेलाही तेच होणार असेल तर स्वबळावर लढू, असा विचार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु आहे.