अ‍ॅड. उज्ज्वल निकम कोटींचे मालक; म्युच्युअल फंड, आलिशान फ्लॅट अन् जमिनी, किती आहे एकूण संपत्ती?

मुंबई : ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपकडून उत्तर-पूर्व मतदारसंघाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याकडे एकूण २७.७० कोटी रुपये इतकी स्थावर आणि जंगम मालमत्ता असून वारसाहक्काने आलेली ४.३५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुलगा अनिकेत याला निकम यांनी ६.९५ कोटी रुपयांचे कर्ज दिले असून त्यांच्यावर एकूण ३७.०९ लाख रुपयांचे कर्ज आहे.

निकम यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील दिला आहे. यात निकम यांच्याकडे ११.३५ लाख रुपयांची रोख रक्कम असून वारसाहक्काने आलेली २२.४१ लाख रुपये रोख आहे. तसेच निकम यांची पत्नी ज्योती यांच्याकडे २७ हजार ८७१ रुपयांची रोख रक्कम आहे. निकम यांनी विविध म्युच्युअल फंडमध्ये ५.०७ कोटी रुपये गुंतवले असून त्यांच्या पत्नीने १.३१ कोटी रुपये गुंतवले आहेत. निकम यांच्या कुटुंबीयांकडे पाथर्डी, पिंपळाड, गंगापूर (नाशिक), मंगरुळ (औरंगाबाद), चोपडा (जळगाव) येथे जमिनी आहेत.

निकम यांच्याकडे अंधेरी, दहिसर आणि जळगाव येथे तसेच मचाळे, जळगाव येथे वारसाहक्काने मिळालेला फ्लॅट आहे. तर त्यांच्या पत्नीकडे माहीम येथील एका फ्लॅटवर ५० टक्के मालकी आहे. एकूणातच निकम यांच्याकडे स्वतःची १७ कोटी ४५ लाख ९५,००५ रु., तर वारसाहक्काने मिळालेली १ कोटी ६७ लाख ५२, ६५५ रु. इतकी जंगम मालमत्ता आहे. तर स्वतःची १० कोटी २४ लाख ७६,९७८ रु. आणि वारसाहक्काने २ कोटी ८६ लाख ४३,५६८ रु. मूल्य असलेली स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी ज्योती यांच्याकडे २ कोटी ९५ लाख ५०,०७० रु. इतकी जंगम, तर ८ कोटी ४६ लाख ११,९१० रु. मूल्य असलेली स्थावर मालमत्ता आहे. उज्ज्वल निकम यांच्यावर ३७ लाख ९,४५२ रु. इतके तर ज्योती यांच्यावर ५ कोटी ७४ लाख ४२,२३६ रु. इतके कर्ज आहे.
पाच वर्षांत संपत्तीत १० कोटींची वाढ, गाड्या, सोनं अन् शेअर्स, हेमंत गोडसेंची एकूण संपत्ती किती?
यामिनी जाधव यांच्या मालमत्तेत वाढ

यामिनी जाधव यांच्या स्थावर मालमत्तेत पाच वर्षांत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामिनी जाधव यांनी २०१९ साली भायखळा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याच्या तुलनेत त्यांची जंगम मालमत्ता मात्र २०२४ साली कमी झाल्याचे दिसून आले आहे. तसेच यामिनी जाधव यांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असून त्यात २.८८ कोटी रुपयांची वसुली असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याविरोधात यामिनी अपिलात गेल्या आहेत.
लाखोंचा बॅंक बॅलन्स, सोने-चांदी, ५ वर्षांत दुप्पट झाली संपत्ती, कोट्यधीश भारती पवारांची एकूण संपत्ती किती?
रवींद्र वायकर संपत्तीत किंचित वाढ

उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवत असलेले रवींद्र वायकर यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१९मध्ये यशवंत वायकर यांच्याकडे १० कोटी १९ लाख ३६,११० इतकी जंगम मालमत्ता होती, तर ती २०२४मध्ये वाढून १२ कोटी २० लाख ६४,२९८ रु. इतकी झाली आहे. रवींद्र यांच्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल आहे. सक्तवसुली संचालनालयाची चौकशी सुरू आहे. रवींद्र आणि त्यांची पत्नी मनीषा यांच्याकडे खेड, रत्नागिरी येथे २.६४ एकर आणि १ एकर १५.८६ गुंठे जमीन या दोन जमीन संयुक्तरित्या नावावर आहे. तर मनीषा यांच्या नावावर कोर्लई, रायगड येथील ४.६७ एकर जागा असून त्याचे बाजारमूल्य २.७५ कोटी रुपये इतके आहे.