यानुसार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी निगडित ‘एटीसी’च्या माध्यमातून मागील तीन दिवसांत १६० हेलिकॉप्टर उड्डाणे झाली आहेत.
हेलिकॉप्टर उड्डाणांचा मंगळवार ३० एप्रिलचा आकडा ५८, बुधवार १ मे रोजीचा आकडा ३२, तर गुरुवार, २ मे रोजीचा आकडा ७० होता. सध्या दररोज सरासरी ६० ते ७० हेलिकॉप्टर उड्डाणे मुंबई विमानतळाशी निगडित ‘एटीसी’द्वारे होत आहेत. या उड्डाणांच्या नोंदीसाठी विमानतळाच्या स्वतंत्र पथकाची नेमणूक नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक आगाऊ सूचनेनुसार अशा उड्डाणांवर देखरेख ठेवून त्याची नोंद घेत ती माहिती राज्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देत आहे.
दुर्गम भागात आयोगाचे अधिकारीही सोबत
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दुर्गम, व्यावसायिक हेलिपॅड नसल्यास किंवा हेलिकॉप्टर उतरण्याची कायमस्वरूपी सोय नसलेल्या ठिकाणी हेलिकॉप्टर जात असल्यास त्यामध्ये आयोगाचे विशेष भरारी पथकदेखील असते. आयोगाचे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना संबंधित हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या प्रत्येक सामानाची सखोल तपासणीचे अधिकार आहेत. यामध्ये केवळ महिला प्रवाशांच्या पर्सची तपासणी करता येत नाही.
असे आहेत नियम…
– दुर्गम भागात निवडणूक प्रचारासाठी वापरात असलेले विमान किंवा हेलिकॉप्टरमधून अधिकाधिक ५० हजार रुपयांची रोख संबंधित राजकीय नेते किंवा उमेदवारांना बाळगण्याची परवानगी
– संबंधित विमान/हेलिकॉप्टरमधून शस्त्र किंवा बेकायदा वस्तू असल्याची नेमकी माहिती असल्यासच विमान/हेलिकॉप्टरमधील प्रवाशांची उतरताना तपासणी करण्याचे आयोगांना अधिकार
– ‘एटीसी’ने सर्व खासगी विशेष विमाने/हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची वेळ, उतरण्याची वेळ, प्रवाशांची यादी, उड्डाण मार्ग यांची इत्यंभूत माहिती टिपणे अत्यावश्यक
– शहरी भागात विमान अथवा हेलिकॉप्टरमध्ये १० लाखांहून अधिक रोख किंवा एक किलोहून अधिक सोने आढळल्यास तातडीने प्राप्तिकर खात्याला कळविणे ‘एटीसी’ला बंधनकारक