Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात दाखल; मुंबई विमानतळावरून साताऱ्यासाठी रवाना, १९ जुलैला होणार भव्य कार्यक्रम

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून ही वाख नखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नख भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. अखेर ही वाख नखे भारतात आली आहेत.

कस्टम विभागाचे अधिकारी आणि सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात लंडनहून आलेली वाख नखे साताऱ्याकडे नेली जात आहेत. मुंबई विमानतळावर सकाळी १० वाजता ही वाख नखे दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाख नखे भारतात आणण्यासाठी गेल्या काही वर्षापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. लंडनहून कस्टमचे अधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही वाख नखे मुंबईत आणली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ही वाख नखे साताऱ्यासाठी रवाना झाली आहेत.

१९ जुलै रोजी साताऱ्यात भव्य कार्यक्रम

लंडनहून आणण्यात आलेली वाख नखे शाहूनगरी सातारा येथे प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या ऐतिहासिक घटनेसाठी सातारा जिल्ह्यात मोठी तयारी करण्यात आली आहे. यासाठी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून तो दिमाखदार आणि राजेशाही थाटात केला जाणार आहे. वाखनख्यांच्या स्वागत सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही वाख नखे सात महिने शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील दोन शाळेतील विद्यार्थ्यांना वाखनखे निशुल्क पाहता येतील. तर इतरांना १० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. याची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ अशी असणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh:लंडनमधून भारतात येणारी वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत; म्युझियम पाठवलेल्या पत्रात स्पष्ट कबुली

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा मोठा दावा


वाघ नखांबाबत काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी असा दावा केला होता की, भारतात आणण्यात येणारी वाख नखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. याबाबत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमशी आपला पत्र व्यवहार झाला असून त्यांनी ही वाख नखे शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले आहे.
Wagh Nakh Latest Update: राज्य सरकार भारतात तोतया वाघ नखे आणत आहे; महाराष्ट्राची घोर फसवणूक होऊ देऊ नये- इंद्रजीत सावंतांची मुनगंटीवार टीका

महाराष्ट्र सरकारने ही वाघनखे पुन्हा राज्यात आणण्याचा तीन वर्षांकरीता भाडेतत्वावर आणण्याचा सामंजस्य करार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी केला होता. जी वाख नखे भारतात येणार आहेत ती १९७१ साली म्यूझियमला भेट म्हणून देण्यात आली होती. लंडनमधील म्यूझियममध्ये भारतातील विविध ठिकाणांहून आलेली एकूण सहा वाखनखे असल्याचे सावंत म्हणाले होते.

इंद्रजीत सावंतांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांची वाख नखे साताऱ्याच्या छत्रपतींकडे कामय राहिली आहेत, याचे ठोस पुरावे देखील आहेत. खरी वाघ नख साताऱ्यातून बाहेर गेल्याचे किंवा कोणाला भेट दिल्याचा पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले होते.