Anant-Radhika यांच्या लग्नात बॉम्बची धमकी, प्रकरणात इंजिनीअर युवक अटकेत, नेमकं काय घडलं?

मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा पार पडला. मुंबईत १२ जुलै रोजी हा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्यात देशातील आणि जगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट समोर आली होती. यामध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलीस यंत्रणेने या प्रकरणी शोध घेतला. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
Anand Mahindra : अंबानींच्या लग्न चर्चेत महिंद्रांची फोटो पोस्ट व्हायरल, ‘ते’ जोडपे कोण?

धमकी देणारा निघाला इंजिनीअर

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या लग्नाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथून एका तरुणाला अटक केली आहे. विरल शाह असे आरोपीचे नाव आहे. हा तरुण इंजिनीअर आहे. आरोपी तरुणाला अटक केल्यानंतर पोलीस त्याला मुंबईत घेऊन येत आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट FFSFIR नावाच्या युजरने केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात बॉम्बस्फोट झाला तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था उलथून जाईल, असा विचार माझ्या मनात येतो, ही पोस्ट व्हायरल झाली होती. यामुळे चिंता निर्माण झाली होती. या पोस्टनंतर पोलिसांनी विवाह सोहळ्याच्या बंदोबस्तात वाढ केली होती.

त्यानंतर याच्या तपासासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली. तपासादरम्यान तो वडोदरामध्ये असल्याचे समजले. मुंबई पोलिसांचे एक पथक वडोदरामध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटच्या लग्नात बॉम्बची धमकी देणाऱ्या अभियंत्याला वडोदरातील वाघोडिया परिसरातून अटक करण्यात आली आहे. वाघोडिया रोडवर असलेल्या सुवर्णा लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये आरोपी राहत होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सकाळी गुजरातमधील त्याच्या राहत्या घरातून अटक केल्याचे त्यांनी सांगितले.