पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची काल सकाळी भेट घेतली. या भेटीमुळे उडालेला धुरळा खाली बसलेला नसताना आता पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचल्या आहेत. शरद पवार आणि त्यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आज मोदी बागेत आहेत. पवार आणि सुळे मोदी बागेत असताना सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
शरद पवार मोदी बागेत असताना नेमक्या त्याच वेळी सुनेत्रा पवारही तिथे पोहोचल्यानं टायमिंगची चर्चा होत आहे. शरद पवार आणि सुनेत्रा पवारांची भेट झाली का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. सुनेत्रा पवार तासाभरापूर्वी मोदी बागेत आल्या होत्या. जवळपास तासभर त्या मोदी बागेत होत्या. त्यानंतर त्या बाहेर पडल्या. त्यांची शरद पवारांसोबत भेट झाली का, याबद्दल उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या काका, पुतण्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं. या निवडणुकीत सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. अजित पवारांच्या होमग्राऊंडवर सुळेंनी त्यांच्या पत्नीला मात दिली. बारामतीत मतदान सुरु असताना सुप्रिया सुळे काटेवाडीतील अजित पवारांच्या घरी पोहोचल्या होत्या. त्यांच्या या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं काटेवाडीतील घर गाठलं होतं. तेव्हाही उलटसुलट चर्चांना उधाण आलं. हे माझ्या काकीचं घर आहे. मी माझ्या काकीला भेटायला, तिचा आशीर्वाद घ्यायला आले होते, असं स्पष्टीकरण सुळेंनी दोन्हीवेळा दिलं होतं. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांनी दोनच आठवड्यांमध्ये सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी दिली. पक्षात अनेक ज्येष्ठ आणि इच्छुक असताना अजित पवारांनी पत्नीची राज्यसभेवर वर्णी लावली.