मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. गेल्या रविवारी मिहिरनं त्याच्या बीएमडब्ल्यू कारनं दाम्पत्याला धडक दिली. त्यात पती कसाबसा वाचला, तर महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांच्या अटकेत असलेल्या मिहिरची चौकशी सुरु आहे. आपल्याला दारुचं व्यसन असल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली आहे. या कबुलीमुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी (७ जुलै) पहाटे साडे पाच वाजता वरळीतील ऍट्रिया थिएटरजवळ मिहिर शहाच्या बीएमडब्ल्यूनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात कावेरी नाखवा या ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मिहिरनं त्यांना २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या अपघातातून कावेरी यांचे पती प्रदिप थोडक्यात बचावले. त्यांनी प्रसंगावधान राखून बोनेटवरुन वेळीच उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
अपघातानंतर मिहिरनं सी लिंकवरुन वांद्रे गाठलं. त्यानंतर त्यानं कलानगर येथे कार सोडली. मग त्यानं गोरेगावातील मैत्रिणीचं घर गाठलं. तिथे तो सकाळी आठपर्यंत होता. मग त्यानं कुटुंबासह शहापूर गाठलं. तिथे तो एका रिसॉर्टमध्ये लपला होता. त्याला विरारमधून अटक करण्यात आली. मित्रानं मोबाईल स्विच्ड ऑन केल्यानं पोलिसांना मिहिरचं लोकेशन समजलं. त्यानंतर पोलिसांनी सुत्रं फिरवली आणि वेगवान हालचाली करत मिहिरला अटक केली.
अपघातानंतर मिहिर शहानं स्वत:ची ओळख लपवण्यासाठी विरारमधील एक सलून गाठलं. तिथे जाऊन त्यानं केस कापले आणि दाढी काढली. पोलिसांना चकवा देण्याचा, त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मिहिरनं केला. पोलिसांनी सलूनमधील कर्मचाऱ्याचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी मिहिरच्या अटकेसाठी अनेक पथकं तयार केली होती. त्याला गेल्या मंगळवारी दुपारच्या सुमारास अटक केली.

मिहिर शहा पोलिसांना ६० तास गुंगारा देत होता. मिहिरचे वडील राजेश शहा शिंदेसेनेत उपनेते होते. हिट अँड रन प्रकरणानंतर शहांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यात मिहिरच्या पालकांसह त्याच्या दोन बहिणींचा समावेश होता.