प्रतिनिधी, मुंबई : दुधाला शासनाने प्रती लीटर पाच रूपये अनुदान जाहीर केले आहे. अनुदान देण्याबाबत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल बनविण्यात आले आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील शेवटच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची जबाबदारी दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. या अनुदानातील अटीपण शिथील करण्यात आल्या आहेत. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे, अशी माहिती दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
आमदार राजेश एकडे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वरील माहिती दिली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, दूध भुकटीचे उत्पादन वाढून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रती किलो ३० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पशुखाद्याच्या दरांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
राज्यात ७० लक्ष मेट्रीक टन पशुखाद्याची निर्मिती होते. पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या यासंदर्भात बैठकाही घेण्यात आल्या आहेत. पशुखाद्य गुणवत्ता आणि दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. पशुखाद्याच्या बॅगवर अंतर्भूत असलेल्या अन्न घटकांचा उल्लेख करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच पशुखाद्य गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी बीआयएस मानांकनाप्रमाणे उत्पादन आणि विक्री करणं बंधनकारक करण्यात आलं असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३० रुपये लीटर आणि ५ रुपये अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला. १ जुलैपासून हे दर लागू झाले आहेत. त्याशिवाय दुधाच्या बुकटीसाठीही सरकारकडून ३० रुपये किलो असं अनुदान देण्यात येणार आहे.
तसंच मुंबई आणि पुण्यात गाईच्या गोकुळ दुधात दोन रुपयांची वाढ झाली असून ५४ रुपये लीटरचं दूध आता ५६ रुपये लीटरला मिळणार आहे. गोकुळने केलेली ही दरवाढही १ जुलैपासून लागू झाली आहे.