१. ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसाचा खेळ सुरुच आहे. सोमवारी धो-धो बरसल्यानंतर दोन दिवस पावसाने ब्रेक घेतला होता. त्यानंतर गुरुवारपासून मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. तर, आज शुक्रवारीही (१२ जुलै) अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…
२. विधान परिषद निवडणुकीत कुणाची होणार फाटाफूट?
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज, शुक्रवारी होत असलेल्या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव अटळ असून सर्वच राजकीय पक्षांनी फाटाफूट टाळण्यासाठी कडेकोट खबरदारी घेतली आहे.
३. दादा गटातील नेत्याच्या आमदार मुलाची बैठकीला दांडी
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज होत असलेल्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव अटळ आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी मोठी खबरदारी घेतली आहे. काँग्रेसच्या बैठकीला चौघा आमदारांची अनुपस्थिती होती. त्यापैकी संजय जगताप आणि यशोमती ठाकूर यांची कळवून गैरहजेरी होती, तर अशोक चव्हाण समर्थक जितेश अंतापूरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवासी बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी यांची अनुपस्थिती होती.
४. मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, आता…
यंदाच्या पहिल्याच मुसळधार पावसात हार्बर मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वेप्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चुनाभट्टी स्थानकातील रेल्वे रुळांची उंची ४ इंचांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्याचे कामही सुरू केले आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…
५. सीएच्या परीक्षेत मुंबई अन् नवी मुंबईचा डंका
प्रथितयश परीक्षांपैकी एक गणल्या जाणाऱ्या सीएच्या फायनल आणि इंटर परीक्षांचे निकाल गुरुवारी सकाळी जाहीर झाले. या दोन्ही परीक्षांमध्ये मुंबई, नवी मुंबई, मिरा रोडमधील विद्यार्थ्यांनी ठसा उमटवला आहे. फायनल परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्राने पहिला, दिल्लीच्याच वर्षा अरोराने दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या क्रमांकावर मुंबईतील किरण मनराल आणि नवी मुंबईतील गिलमन अन्सारी हे विद्यार्थी संयुक्तपणे आहेत. इंटर परीक्षेत ऑल इंडिया रँकपैकी राजस्थानच्या कुशाग्र रॉयने पहिला, अकोल्याच्या युग कारियाने दुसरा आणि भाईंदरच्या यज्ञ चांडकने तिसरा क्रमांक पटकावला.
६. क्रूरतेनंतर आता मिहीरला पश्चाताप
‘वरळी येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पाहून मिहीरने डोक्यावर हात मारून घेतला. आपल्याकडून इतके भयंकर कृत्य घडले, यावर विश्वास ठेवणं त्याला कठीण जात आहे असल्याचं त्याने सांगितलं आहे,’ असे पोलिसांनी म्हटले आहे.
७. युरोपात दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहियाची लुटमार
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या ८ जुलै रोजी त्यांच्या लग्नाचा ८ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोपला रोमँटिक टूरवर गेले होते. मात्र तिथे ते धोकाधाडीच्या प्रकाराला सामोरे गेले आहेत. गेले काही दिवस ते सोशल मीडियावर त्यांच्या युरोप सहलीची झलक शेअर करत आहेत. या ट्रिपमध्ये त्यांचे सर्व सामान चोरीला झाल्याचे त्यांनी सांगितले. चोरी झालेल्या सामानात पासपोर्ट, पर्स आणि प्रवासात खरेदी केलेल्या सर्व वस्तूंचा समावेश होता. या सर्वांची एकूण किंमत १० लाख रुपये होती. भारतात परत येण्यासाठी मदतीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
८. अनंत राधिकाच्या मुंबई एअरपोर्टवर हॉलिवूडकरांची गर्दी
भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे सध्या संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. आज १२ जुलै रोजी अनंत आणि राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. अनंतच्या लग्नाला केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. गेले काही दिवस मुंबई मायानगरी या सोहळ्यांनी दुमदुमलेली पाहायला मिळते. या भव्यदिव्य लग्नासाठी जगप्रसिद्ध हॉलिवूड सेलिब्रिटी किम कार्दशियन आणि तिची बहीण क्लो कार्दशियन मुंबईत आल्या आहेत.
९. अर्थसंकल्पापूर्वी सरकारने दिली गुड न्यूज
सर्वसामान्य अर्थसंकल्पापूर्वी सुमारे सात कोटी ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी (EPFO) ठेवींच्या व्याजदरात वाढ करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये ईपीएफओने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी व्याजदर ८.२५% करण्याची घोषणा केली होती, ज्याला आता अर्थ मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
१०. विधान परिषद निवडणुकीचे ताजे अपडेट्स
आज १२ जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान हे मतदान पार पडणार आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…