Breaking News 12th July 2024: मुंबईत पहाटेपासून पावसाचा जोर, लोकल वाहतुकीवर परिणाम

CA Final Result: सीएच्या परीक्षेत मुंबई अन् नवी मुंबईचा डंका, भाईंदरच्या यज्ञ चांडकचा तिसरा क्रमांक

प्रथितयश परीक्षांपैकी एक गणल्या जाणाऱ्या सीएच्या फायनल आणि इंटर परीक्षांचे निकाल गुरुवारी सकाळी जाहीर झाले. या दोन्ही परीक्षांमध्ये मुंबई, नवी मुंबई, मिरा रोडमधील विद्यार्थ्यांनी ठसा उमटवला आहे. फायनल परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्राने पहिला, दिल्लीच्याच वर्षा अरोराने दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या क्रमांकावर मुंबईतील किरण मनराल आणि नवी मुंबईतील गिलमन अन्सारी हे विद्यार्थी संयुक्तपणे आहेत. इंटर परीक्षेत ऑल इंडिया रँकपैकी राजस्थानच्या कुशाग्र रॉयने पहिला, अकोल्याच्या युग कारियाने दुसरा आणि भाईंदरच्या यज्ञ चांडकने तिसरा क्रमांक पटकावला.