ओबीसी प्रमाणपत्राचा गैरवापर? IAS पूजा खेडकर यांचा सोशल मीडियावर मॉक इंटरव्ह्यू चर्चेत

मुंबई : महाराष्ट्र केडरच्या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांना यूपीएससी परीक्षेत ८२१ वा क्रमांक पटकवला होता. मात्र पुण्यात प्रशिक्षणादरम्यान व्हीआयपी नंबर, घर, गार्ड आणि गाडी मागणाऱ्या पूजा खेडकर यांच्याबाबत काही नवीन खुलासे झाले आहेत. अनेक वादांनंतर खेडकर यांची वाशिम येथे बदली केली. आतापर्यंत त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता त्यांचा मॉक इंटरव्ह्यूचा व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये पूजा खेडकर आपली आई वडिलांपासून विभक्त झाल्याचा दावा करत आहेत. मात्र त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकतीच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या शपथपत्रात ते आपल्या पत्नीपासून वेगळे असल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. याशिवाय यातला नवा ट्विस्ट म्हणजे पूजा खेडकर यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन नॉन क्रिमेलेअरच्या अटीचं उल्लंघन केलं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
Worli Hit And Run Case : हिट अँड रन प्रकरणातील पिडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाखांची मदत

मॉक इंटरव्ह्यूमध्ये काय समोर आलं?

सोशल मीडियावर समोर आलेल्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये पूजा खेडकर यांना समोर बसलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रश्न विचारला जातो, की तुम्ही अधिकाऱ्याच्या मुलगी आहात, यात तुम्ही तुमचं उत्पन्न शून्य का दाखवलं आहे? त्यात स्पष्टीकरण देताना पूजा खेडकर म्हणतात, की माझे आई-वडील विभक्त असून मी आईकडे राहते आणि आईकडे उत्पन्नाचा स्त्रोत नाही.
Crime News : कूलर बंद झाल्याच्या निमित्ताने वाद विकोपाला गेला, आनंदाच्या क्षणी भर लग्नात घडला अनर्थ
पूजा खेडकर यांचे वडील प्रदूषण विभागाचे निवृत्त आयुक्त आहेत. तर त्यांच्या आई अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमधील भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. या कुटुंबाने आपल्या शपथपत्रात दाखवलेली संपत्ती ४० कोटींची आहे. त्यामुळे नॉन क्रिमेलेअरच्या अटीचं उल्लंघन केल्याची शक्यता यूपीएसच्या परिक्षार्थींकडून व्यक्त केली जात आहे. नॉन क्रिमेलेअरच्या अटीनुसार, तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न ८ लाखांच्या वर असेल, तु ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. दुसरीकडे, पूजा खेडकर यांच्या वादामुळे यूपीएससी विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. तसंच पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

बनावट अपंगत्व प्रमाणपत्र जोडलं?

आयएएस डॉ. पूजा खेडकर यांनी बनावट अपंगत्व आणि ओबीसी क्रीमीलेयर प्रमाणपत्र सादर केल्याबाबत चर्चा असतानाच दुसरीकडे २०२१ मध्ये पूजा यांची यूपीएससीमार्फत क्रिडा प्राधिकरणात सहाय्यक संचालक म्हणून निवड झाली होती. यावेळी त्यांनी आपण दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र जोडलं होतं. तर २०२३ मध्ये IAS निवड झाली तेव्हा पूजा खेडकर दृष्टीदोष झाल्याचं प्रमाणपत्र जोडलं होतं.

दरम्यान, पूजा खेडकर यांच्या यूपीएससीमध्ये निवडीवरुन वाद निर्माण झाला आहे. आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात वादग्रस्त आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या वागणुकीत अनप्रोफेशनल असल्याचं समोर आलं. तसंच त्यांच्याकडून मोठ्या सन्मानाची मागणी करण्यात आली होती. त्याशिवाय पूजा यांच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मागण्या पूर्ण न केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही स्थानिक अधिकाऱ्यांना दिली असल्याची चर्चा आहे.