या प्रकरणात मिहीर याला कोर्टासमोर आज हजर करण्यात आले होते. मिहीर याची पोलीसांनी अधिक तपासासाठी कस्टडी मागून घेतली आहे. मिहीरने कोर्टात कबूली दिला आहे अपघाताच्या दिवशी आपणच कार चालवत असल्याची. कोर्टाने सुद्धा मिहीर याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिहीरने अपघात झाल्यानंतर मुंबईतून पळ काढला होता. वडील राजेश शहा यासह आणखी बारा जणांनी मिहीरला लपवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.
पण सोशल मीडियावर नेटीझन्सकडून तसेच विरोधकांकडून सरकारवर टीका होवू लागली, मिहीर शहा यांचे वडील एकनाथ शिंदे गटाचे नेते असल्याने शहा कुटुंबावर राजकीय वरदहस्त आहे असा आरोप होवू लागला. याच पार्श्वभूमीवर मिहीर शहा याच्यासाठी लुकआउट सर्क्युलर काढण्यात आले तर दुसरीकडे सहा पोलीसांच्या तुकड्या मिहीरला शोधण्यात तैनात करण्यात आल्या होत्या काल अखेर पोलीसांनी मिहीरला बेडया ठोकल्या. तर मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांची शिंदेंच्या सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मृत कावेरी नाखवा यांचा कुटुंबाची भेट आज आदित्य ठाकरे यांनी घेतली तशीच मिहीरला कोळीवाड्यात सोडून द्या तो एक राक्षस आहे अशा शब्दात मिहीरवर ठाकरेंनी टीका केली. तर कावेरी नाखवा यांचे कुटुंब मिहीरला सुद्धा कारसोबत तसेच फरफटत नेत शिक्षा द्या अशी मागणी करत आहेत. मागील दोन दिवसांपासून कावेरी नाखवा यांचे कुटुंब न्यायासाठी लढताना दिसतात, आता पोलीस कस्टडीत आणखी काय सत्य समोर येते ते पाहणे महत्त्वाचे असेल.