मिहीर केवळ रेड बुल प्यायला, पण तरीही बार गोत्यात; कारणे दाखवा नोटिस बजावण्यामागे कारण काय?

मुंबई : राज्य सरकारने वरळी हिट एंड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याने अपघातापुर्वी जुहूतील एका बारला भेट दिली होती त्याच बारला सरकारने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. सीएम एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उपनेते राजेश शहा यांचा मिहीर शहा हा २४ वर्षाचा मुलगा याने रविवारी सकाळी वरळीत एका दाम्पत्याचा दुचाकीला जोरदार धडक दिली आणि साधारण दोन किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत त्याने महिलेला फरफटत नेले. अपघातात महिलेचा जीव गेला आहे. तपासादरम्यान पोलीसांना आरोपी मिहीर शहा अपघातापूर्वी जुहूच्या ‘वाइस ग्लोबल तपास बार’मध्ये आढळून आला होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारचे मालक करण शाह यांना नोटीस बजावली आहे, यासह चौकशीला मालक करण शाह यांनी पोलीसांसमोर उपस्थित राहावे तोपर्यंत बारमध्ये फक्त खाद्यपदार्थ विक्री करु शकतात, दारु विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. एनआयने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांच्या तपासात राज्य उत्पादन शुल्क यांना बारने काही नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले म्हणून ही नोटीस बजावली असे समजते.

पोलीसांना संशय होता मिहीर शहा याने अपघातापुर्वी दारु घेतल्याचा पण बार मालकाचे म्हणे आहे मिहीरने दारु घेतली नव्हती त्याने फक्त रेड ब्ल्यू घेतले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बार मालक करण शहा म्हणालेत की शनिवारी ६ जुलैला रात्री अकरा वाजता ४ मित्रांसह मिहीर बारमध्ये आले होते, त्यानंतर साधारण १.४० च्या सुमारास अलिशान कारमधून सारे निघून गेले. मिहीर याचे एकूण बील १८ हजार ७३० इतके झाले होते बील मिहीरच्या मित्राने दिले.

आणि काही तासानंतर मिहीरने वरळीत दुचाकीला धडक दिली आणि ज्यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आता बारमध्ये किती जण जमले होते त्याने दारु घेतली होती का अशा पद्धतीने तपास करत आहेत.आता मिहीरला तीन दिवसाने पोलीसांनी अटक केली आहे यावर खासदार वर्षा गायकवाड यांनी वरळी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी तीन दिवस का लागले? असा सवाल सरकारला केला आहे तसेच सरकार आरोपीला वाचवत आहे का? असा प्रश्न सुद्धा वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.आता आरोपीची वैद्यकीय चाचणी केली तर तो दारु प्यायला होता हे निष्पन्न होणारच नाही त्यासाठीच जाणीवपूर्वक तीन दिवसाने त्याला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर १०३ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे.