सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला आणि उपसभापती नीलम गोऱ्हे तो मंजूर झाल्याचे जाहीर केले. आज मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानकाचे नाव लालबाग स्टेशन, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाडे नाव डोंगरी तर पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्सचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोडचे नाव गिरगाव रेल्वे स्थान असे करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव आता काळाचौकी असे करण्यात येणार आहे. तर डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे माझगाव रेल्वे स्थानक असे करण्यात येईल. हार्बर मार्गावरील आणखी एक म्हणजे किंग सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
कोणत्या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येणार, अशी आहे संपूर्ण यादी
जुने नाव | प्रस्तावित नवे नाव |
करी रोड | लालबाग (मध्य रेल्वे) |
सॅण्डहर्स्ट रोड | डोंगरी (मध्य रेल्वे) |
मरीन लाईन्स | मुंबादेवी (पश्चिम रेल्वे) |
चर्नी रोड | गिरगाव (पश्चिम रेल्वे) |
किंग सर्कल | तीर्थंकर पार्श्वनाथ (हार्बर मार्ग) |
डॉकयार्ड | माझगाव(हार्बर मार्ग) |
कॉटन ग्रीन | काळाचौकी(हार्बर मार्ग) |
विधान परिषदेत मंजूर करण्यात आलेला हा प्रस्ताव आता विधान सभेत देखील मंजूर केला जाईल आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्य सरकारकडून नावे बदलण्याचा हा प्रस्ताव झाला असला तरी याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारचा असेल. या प्रस्तावाला केंद्राची मंजूरी दिल्यानंतरच प्रत्यक्षात स्थानकांची नावे बदलली जातील.