कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपच्या सुनील कांबळे यांच्या विरोधात काँग्रेसच्या माजी मंत्रींचा पुत्र अविनाश बागवे इच्छुक आहेत. अविनाश बागवे यांनी तशी तयारी आणि पक्ष संघटना बांधणी ही सुरू केली आहे. काँग्रेस पक्षातून कान्टोन्मेंट जागेसाठी अविनाश बागवे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे. त्यामुळे शिवसेनेने दावा केलेल्या मतदारसंघावर काँग्रेसला जागेसाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे.
बागवे कुटुंब मूळ काँग्रेस विचारातून चालत आले आहे. अविनाश बागवे यांचे वडील रमेश बागवे २००४ आणि २००९ असे दोन टर्म आमदार राहिले आहेत. तसेच रमेश बागवे यांनी २ वर्ष गृह राज्य मंत्री पद ही सांभाळले आहे. अविनाश बागेव देखील २००७ ते २०१७ असे तीन टर्म नगरसेवक राहिले आहेत. दरम्यान २०१० ते २०१२ युवक काँग्रेस अध्यक्ष, २०१२ मध्ये क्रीडा समिती अध्यक्ष, २०१५ ते २०१८ स्थियसमिती सदस्य असे पद अविनाश बागवे यांनी उपभोगले आहेत. त्यामुळे ग्राउंड रूट राजकारणाचा दांडगा अनुभव अविनाश बागवे यांना आहे.
कान्टोन्मेंट मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण २०१९ मध्ये सुनील कांबळे यांनी भारतीय जनता पक्षाकडून या जागेवर उमेदवारी मिळाली होती. कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश बागवे यांचा ५०१७ मतांनी पराभव करून ही जागा जिंकली. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविनाश बागवे कितपत प्रभावशाली ठरतील की काँग्रेस शेवटच्या टप्प्यात वेगळा विचार करतील, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून उमेदवारीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.