दहा आमदार ट्रेनमध्ये अडकले
विदर्भ सुपरफास्ट एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी मुंबईत प्रवेश केला. मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचण्याआधी कुर्ला भागातच त्या अडकल्या. परिणामी पावसाळी अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार-मंत्र्यांनाही फटका बसला आणि ते ट्रेनमध्ये अडकले. दीड तासांपासून ट्रेन अडकून पडली होती. त्यामुळे अनेक जणांनी रुळांवरुन चालत नजीकचे स्टेशन गाठणे पसंत केले.
रुळांवरुन चालत प्रवास
मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आमदारांना फटका बसला असून मिटकरी, अनिल पाटील, एकनाथ खडसे, संजय गायकवाड, प्रकाश भारसाखळे, हरिश पिंपळे, संजय सावकारे, किशोर पाटील, किरण सरनाईक, माजी आमदार जोगेंद्र कवाडे यासारखे ९ ते १० आमदार विदर्भ एक्स्प्रेसमध्ये अडकले असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली. अखेर रेल्वे रुळावरुन पायी चालत त्यांनी पुढील प्रवास केला. कुर्ला नेहरू नगर पूर्व भागात पोलीस चौकीत आमदारांना आसरा घ्यावा लागला.
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि मुंबई विभागातील कल्याण-कसारा विभागातील खडवली – टिटवाळा दरम्यान पाणी साचल्यामुळे काही रेल्वे सेवांवर परिणाम झाले आहेत.
रद्द झालेल्या ८ जुलै रोजीच्या अप गाड्या
१. १११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
२. १२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
३. ११००८ पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
४. १२१२८ पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस
रद्द झालेल्या ८ जुलै रोजीच्या डाऊन गाड्या
१. ११००९ मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
२. १२१२७ मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
३. १२१२३ मुंबई-पुणे डेक्कन क्वीन
४. ११००७ मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस