दीपक पडकर, बारामती: राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटात विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारेच सारखे आहेत. असाच काहीसा हा संदेश देणारा एक फलक तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या निमित्ताने बारामती शहरात उभा करण्यात आला आहे. राजकारण्यांच्या पंढरीत तुमचे स्वागत असं… वारकऱ्यांचे स्वागत करताना या फलकावर सर्वच पवार कुटुंबाचे फोटो एकत्रित छापण्यात आले आहेत. यामुळे या फलकाची बारामतीसह संपुर्ण राज्यात चर्चा होत आहे.
बारामतीतील देशमुख चौकात उभारलेल्या या फलकाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ८ नंबर बॉईज नावाच्या ग्रुपने हा फलक उभा केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार यांची छायाचित्रे फलकावर एकत्रित मांडलेली आहेत. यामध्ये राजकारणाच्या पंढरीत वारकरी भक्तांचे स्वागत अशा स्वरूपाचा आशय लिहिला आहे.खरंतर बारामतीकरांच्या मनातलं हे स्वप्न की सारे एकत्र असावेत. सध्या ते विभागले गेले असले तरी सामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टीने की, जे दोन्ही गटात विभागले गेलेले नाहीत. अशांसाठी मात्र हे सगळेच सारखे आहेत. त्यामुळे सर्वांचा एकत्रित फोटो छापून राजकारणाच्या पंढरीत तुमचे स्वागत, अशा स्वरूपाचा हा फलक उभा केला आहे. दरम्यान जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज बारामती शहरात असून बारामती शहरांमध्ये पालखीचे आगमन झाले आहे. या पालखीचे स्वागत करण्यासाठी वरूणराजाने हजेरी लावली असून या पावसामध्ये वारकरी चिंब भिजले होते. शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार गटाचे खासदार सुलेत्रा पवार योगेंद्र पवार हे संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेणार आहेत.

बारामती म्हटलं की, ती कविवर्य मोरपंथांची बारामती, बारामती म्हटलं की ती देशातील आणि राजकारणातील राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेली बारामती.. असे म्हटले जाते. एकूणच देशाच्या किंवा राजाच्या कानाकोपऱ्यात गेलं आणि बारामतीचे नाव सांगितलं की ती पवारांची बारामती म्हणून ओळखली जाते. त्याच पार्श्वभूमीवर हा फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.