उपक्रमासाठी तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची केली निवड
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांपैकी तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. यामध्ये लोणी काळभोर ते यवत या प्रवासादरम्यानचा टप्पा निवडण्यात आला. या उपक्रमाचे नियोजन प्रत्यक्षात यवतपर्यंतच्या पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या विविध विसाव्याच्या टप्प्यांची आणि यवतमधील मुक्कामी ठिकाणांची पाहणी करून करण्यात आले.
‘निसर्गाचे संवर्धन’ हाच उपक्रमाचा मुख्य उद्देश
”भक्तीच्या शक्तीतुन निसर्ग संवर्धन” या उपक्रमाच्या अंतर्गत तीन उपक्रम राबवण्यात आले जसे की, बी आणि बी बियाणे वाटप, सौर ऊर्जेवर चालणारा मोबाईल चार्जर, सौर उर्जेवर चालणारी उपकरणे आणि धूर विरहित जैवइंधन वापरून चालणारी चूल यांचा समावेश आहे. प्रथम उपक्रमात मातीत रुजवलेल्या बी बियाणांचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. हे करत असताना वारकऱ्यांची विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्राशी निगडित वेगवेगळ्या विषयांवर जसे की, विविध प्रकारची झाडे, त्यांचे उपयोग, देशी व विदेशी झाडे यावर विचारांची देवाणघेवाण केली. त्यामध्ये हवा शुद्ध करणारी, पाणी शुद्ध करणारी औषधी वनस्पती, दुर्मिळ प्रजातींची झाडे याबद्दल विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना माहिती दिली. या उपक्रमात अखेरीस सीडबॉलचे वाटप करून वारकऱ्यांना वारी मार्गावर नदीच्या ओढ्यांचा किनारी आणि मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात या बियाणांचे रोपण करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या उपक्रमाची मुख्य संकल्पना एस.के.सी.ओ.ए.चे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण यांची होती. हा उपक्रम राबवण्यासाठीचे मार्गदर्शन बी.आर्किटेक्चरचे विभागप्रमुख डॉ. शोभन केळकर व एम. आर्किटेक्चरचे विभागप्रमुख प्रोफेसर श्रीमती नेहा मसलेकर यांनी केले.