अजित पवार सुरुवातीलाच म्हणाले,
अर्थसंकल्प महिला, कष्टकरी वर्ग, शेतकरी आणि सर्वसामान्यांना बळकटी देण्याचा हेतूने तयार केला आहे. सभागृहात दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडतोय, मी कोणत्याही बाजूला असलो तरी मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली जाते ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही. महायुतीकडून अर्थसंक्लप मांडला की महाविकास आघाडी विरोध करते आणि महाविकास आघाडीकडून मांडला तेव्हा महायुती विरोध करायची हरकत नाही असे म्हणत अजित पवारांनी राज्यातील महसूली जमा आणि तूट याबद्दल लेखाजोखा विधानसभेच्या पटलावर मांडला.
केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या महसूली करात वाढ होणार अशी माहिती अजित पवारांनी सभागृहात दिली. दरवर्षी जीएसीटीमधून ३० ते ३५ हजार कोटींची वाढ दरवर्षी पाहायला मिळते.राज्यात महसूली जमा वाढलेली आहे, 20 हजार कोटींची महसूली तूट दिसली तरी त्यावर नियंत्रण आणू.महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्याचे उत्पादन ४४ लाख कोटी आहे, देशात १४ टक्के जीडीपीचा वाटा महाराष्ट्र देतोय.
राज्यावर ७ लाख ८२ हजार कोटींचे कर्ज
विरोधकांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडल्यावर राज्यावर कर्ज वाढले आहे अशी टीका केली होती यावरच अजित पवारांनी आज सभागृहात उत्तर दिले, राज्यावर ७ लाख ८२ हजार कोटींचे कर्ज झालेले आहे अजित पवारांनी सभागृहात दिली माहिती, महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पुढे आहे, राज्यात १० टक्क्याने मागील वर्षापेक्षा अतिरिक्त कर्जाचा बोजा वाढला आहे. राज्यातील भांडवली आर्थिक तरतूदीत वाढ केली आहे. राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, राज्यातील अर्थसंकल्पात कर्ज फेडण्याची मोठी क्षमता आहे, राज्याच्या इकॉनमीला कमी समजू नका असे विरोधकांना अजित पवारांनी ठणकावून सांगितले.