आत्मे भटकत असतात; नरेंद्र मोदी दिल्लीत असले तरी, त्यांचा आत्मा देशभर फिरतोय- रामदास आठवले

पुणे (आदित्य भवार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात झालेल्या सभेत ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला होता. या उल्लेखानंतर राज्यातील राजकारणात प्रत्येक सभेत याचा उल्लेख होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून यावर बोलले जात असताना आज पुण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील महाविकास आघाडीतील नेते केवळ आरोप करत सुटले आहेत , असे सांगत रामदास आठवले यांनी इंडिया आघाडी ही बिनकामी असल्याचे म्हटले. एक तर आत्मे सगळीकडे भटकत असतात. नरेंद्र मोदी हे गुजरातचे असले. सध्या दिल्लीला राहतात, तरी त्यांचा आत्मा देशभरात भटकतोय, फिरतोय. नरेंद्र मोदी गुजरात सोडून महाराष्ट्रात येत असल्याचा आरोप केला जातो. पण लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो. जे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करतात त्यांना माझा प्रश्न आहे की, जर लोकशाही धोक्यात असती तर मोदी मत मागण्यासाठी आले असते का? असा सवाल रामदास आठवले यांनी विरोधकांना केला.
मतदान संपल्याबरोबर काँग्रेसमध्ये खळबळ; दोघांचे निलंबन, शिवानी वडेट्टीवार यांच्यासह ४९ नेत्यांना कारणे दाखवा नोटीस

देश हा संविधानानुसार चालतो. जे ज्यांना मान्य नसेल, ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांना आम्ही चले जावो असे सांगू. मी देशातील १७ राज्यांचा दौरा केला असून देशात आमच्या बाजूने वातावरण आहे. तामिळनाडूमध्ये देखील एनडीएच्या जागा निवडूण येतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. आम्ही दिलेल्या नाऱ्याप्रमाणे ४०० जागा जिंकू. राज्यातील मोदींच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ४० जागा नक्की निवडूण येतील, असे आठवले म्हणाले.

भटकती आत्मा पंतप्रधान कुणाला म्हणाले? अजित पवार उत्तर मागणार


संजय राऊतांना टोला
राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजेंना उमेदवारी का दिली नाही? कोल्हापुरात मतदान होण्याआधी उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

नरेंद्र मोदी यांचा आत्मा भटकत आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर उत्तर देताना आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी त्यांना केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे. यांनी राज्याचा खेल खंडोबा केलाय. नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा, कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा; अशी कविता देखील त्यांनी सादर केली. पुणे जिल्ह्यातील चारही जागा आणि मुंबईतील ६ जागा आम्ही जिंकू असा विश्वास आठवलेंनी यावेळी व्यक्त केला.