काही अपरिहार्य परिस्थितीमुळे हार्बर लाईन सेक्शनमधील लोकल ट्रेन सीएसएमटी – वडाळा रोड दरम्यान बंद ठेवण्यात आली आहे. प्रवाशांना सीएसएमटी आणि कुर्ला सेक्शन दरम्यान अप आणि डाऊन दिशेने मेनलाइनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे, असं सेंट्रल रेल्वेने ट्विटमध्ये सांगितले आहे. या घटनेने अन्य हार्बर लाईनच्या स्थानकांवरही आता प्रवाशांची गर्दी वाढत आहे.
या घटनेमुळे सीएसएमटी ते पनवेल दरम्यानच्या लोकल सेवा ठप्प झाली आहे. सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सेवा एका मागे एक उभ्या असल्याने प्रवासी लोकल डब्यात अडकून पडले आहे. यामुळे काही प्रवासी रुळांवर उतरून चालत निघाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लोकल रेल्वे रुळावरून घसरल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले असून रेल्वेच्या कारभारवार प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर हार्बर लाईनच्या लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असताना आजही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे येणारी लोकल सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ घसरली आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आली.मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ दुपारी ४.१५ च्या सुमारास हार्बर लाईनची लोकल ट्रेन घसरली. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून येत आहे. पुन्हा प्लॅटफॉर्म २ जवळ घसरली आहे. सलग दुसऱ्यांदा हार्बर लाईनची लोकल घसरली आहे. यामुळे कामावरुन घरी जाण्याऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रेल्वे रुळावरून घसरलेला लोकल ट्रेनचा डबा उचलून रेल्वे रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न काम सुरू केले आहे.