पुणे (बारामती) : आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा; माझीया सकळा हरीच्या दासा!! कल्पनेची बाधा न हो कवणे काळी; ही संत मंडळी सुखी असो!! ही उक्ती नाही शेकडे वर्षांची आहे.. ही संत मंडळी पायी चालतात पंढरीच्या दिशेने.. पंढरीच्या पांडुरंगाच्या ओढीने.. ही गोडी भागवत संप्रदायातल्या प्रत्येकाला लेकुरवाळा विठुरायाच्या भेटीची आस निर्माण करते. तहान-भूक, वय, जेष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ सारंकाही विसरून ही आषाढीवारी फुलत राहते पंढरीच्या दिशेने..! यात हौशेनवशे देखील असतात बरं.. पण काहीजण असतात, जे विठुरायावरची श्रद्धा, भक्ती हृदयात ठेवून पंढरीच्या दिशेने जायची इच्छा व्यक्त करतात.. अनेकांना ते शक्य होतं, अनेकांना शक्य होत नाही.. ज्यांना शक्य होत नाही, त्यांना काही श्रावण बाळ असे ही असतात, जे वाटेल ते सायास करत अशा अशक्य गोष्टी शक्य करून ठेवतात..पंढरीच्या दिशेने चाललेल्या ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात फलटणच्या सुंदर आजी नातवाच्या खांद्यावर बसून पंढरपूरला निघाल्यात. नातवाच्या खांद्यावर बसून विठुरायाचे त्यांना दर्शन घ्यायचं आहे. वय वर्ष नव्वद..पण पंढरीला जाण्याची ओढ मात्र अगदी तरुणपणाची… गेली १० वर्षे त्या पायी पंढरीला जातात. गेल्या तीन वर्षांपासून गुडघे थकले, दमले. त्यामुळे चालता येत नाही, अशावेळी त्यांचा नातू त्यांचा आधार बनला.
अनेकदा म्हटलं जातं की, नवीन पिढीला अध्यात्माचा फारसा वारसा नाही, किंवा त्याचं महत्त्व नाही, परंतु असे नाही. पुण्यासारख्या महागड्या शहरांमध्ये मॉलमध्ये काम करणारा प्रशांत नावाचा नातू या सुंदर आजींसाठी सारथी बनला आहे. या प्रशांतच्या तर कधी दुसरा नातू महेशच्या खांद्यावर बसून सुंदर आजी हात जोडून पंढरीला निघाल्या आहेत.
अनेकदा म्हटलं जातं की, नवीन पिढीला अध्यात्माचा फारसा वारसा नाही, किंवा त्याचं महत्त्व नाही, परंतु असे नाही. पुण्यासारख्या महागड्या शहरांमध्ये मॉलमध्ये काम करणारा प्रशांत नावाचा नातू या सुंदर आजींसाठी सारथी बनला आहे. या प्रशांतच्या तर कधी दुसरा नातू महेशच्या खांद्यावर बसून सुंदर आजी हात जोडून पंढरीला निघाल्या आहेत.
काल त्यांनी अवघड दिवेघाट सहजगत्या पार केला. नातू प्रशांत त्यांनी सांगितले की, त्रास कशाचा? माझ्या आजीला पंढरपूरचा पांडुरंग दाखवायचा आहे, तर त्याचा त्रास कशाचा? उलट आजीच्या निमित्ताने माझी दर्शन वारी घडतीये, माझं व्रत कामाला आल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे उलट मला खूप मनापासून आनंद वाटतो असे प्रशांत यांवी सांगितले. प्रशांत हे पुण्यातील एका मॉलमध्ये काम करतात, मात्र आषाढी वारी आली की ते १५-१६ दिवस त्यांना सुट्टी घ्यावीच लागते.