रेल्वे रुळाला तडा
नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दोन रुळ जोडणीच्या ठिकाणी तडा गेल्याने धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती. बिघाड दुरुस्तीनंतर पहिली लोकल १०.५० च्या सुमारास रवाना झाली. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव लोकल ३० किमी प्रति तास वेगाने धावत आहेत. दरम्यान बिघाडामुळे लोकलच्या लांब लचक रांगा लागल्याने लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. बिघाडाची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी एक्सवरून दिली.
प्रवासी रेल्वेतून उतरताना फलाटाखाली आला
दुसरीकडे, पश्चिम रेल्वेवर बोरिवलीकडे जाणाऱ्या धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करताना प्रवासी स्थानकातील लोकलमधील पायदान आणि फलाट यांच्या पोकळीत अडकला. कांदिवली स्थानकात रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. लोकलच्या पहिल्या डब्यातील चाकाखाली प्रवासी आल्याने सुमारे अर्धा तास लोकल खोळंबली होती. पावणे दहाच्या सुमारास लोकल बोरिवलीसाठी रवाना झाली. दरम्यान यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या.