निधी वाटपाचा नेमका घोळ काय?
एक दमडी सुद्धा सरकारने मला निधी म्हणून दिली नाही, सगळ्यांना पत्र लिहली कार्यलायात पन्नास फोन केली पण आमदार कटोरा घेवून दारात असताना माझ्या मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने ५० कोटी आले असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी भर सभागृहात केला.मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडुन आलेलो आहे पण मला पैसे मिळत नाही जनहितासाठी पण माझ्याच मतदारसंघात ५० कोटी येतात एका ठाराविक व्यक्तीद्वारे मला पाडण्यासाठी षडयंत्र रचले जातात, आचारसंहिता जाहीर होताच ७५ हजार कोटींचे टेंडर काढले, लोकसभेसाठी मतदारसंघात ७० ते ७५ कोटींचे पैसे वाटप केले तर विधानसभेत तर पाऊस पाडतील असा सुद्धा दावा जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केला. जितेंद्र आव्हाडांच्या याच आरोपांवर भाजप आमदार अतुल भातखळकर, मनिषा चौधरी, संजय कुंटे यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात आव्हाडांच्या विधानाचा निषेध केला.
अतुल भातखळकर काय म्हणाले
“सर्वसाधारण अर्थसकंल्पावरील चर्चा चालू आहे पण आव्हाडांनी खोटे आरोप करणे आणि सरकारला जातीयवादी बोलणे असे सभागृहात बोलण्यासाठी परवानगी नाही, ज्यांच्यावर अपहरणाची केस आहे त्यांने तर बोलूच नये” कामकाजातून जातीयवादी आणि पैशांचे गंभीर आरोप हे उद्गार काढून टाकावे अशी मागणी अतुल भातखळकरांनी केली.
संजय कुंटे काय म्हणाले
हवेमध्ये काहीही आरोप करायचे आणि अशाप्रकारे विधानसभेत बोलणे चुकीचे आहे. सरकारबद्दल चुकीचे बोलणे योग्य नाही आरोप आहे तर आताच्या आता पुरावे सादर करा सभागृहात, नाहीतर पैसेवाटप आणि जातीयवादी सरकार असे बिनबुडाचे आरोप विधानसभेच्या पटलावरुन काढून टाका अशी मागणी संजय कुंटे यांनी केली.