जितेंद्र आव्हाड काय म्हणाले
लोकसभेच्या निकालात आम्ही ४५ जागा मिळवू अशी घोषणा करणारे महायुती १७ वर येवून थांबले, त्यामुळे सादर केलेला अर्थसंकल्प ‘मरता क्या नही करता’ असा सवाल आव्हाडांनी विचारला. अर्थसंकल्पात ज्या योजना घोषित केल्या त्या पुर्णत्वास जाणार का? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला तर विरोधक नरेटीव्ह सेट नाही करत शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हे नरेटीव्ह नाही वास्तव आहे असे मत आव्हाडांनी मांडले. याचे एक नेते दररोज ट्वीवटर वर टाकतात ‘व्होट जिहाद’ आहे म्हणजे तुम्ही दररोज मुस्लिमांना चिमटा काढणार, डिवचणार आणि तुम्ही अपेक्षा करता की मुस्लिम समाजाने तुम्हाला वोट द्यावे तर चुकीचे आहे या देशातील हिंदु जनतेचे तुमचा पराभव केलाय असे विधान आव्हाडांनी केले.
सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात दोन एक अडीच लाखाने हारले किती मुस्लमान आहेत तिथे, केंद्रीय मंत्री भारती पवार तीन एक लाख मताने दिंडोरीतून हारल्या किती मुस्लमान आहेत तिथे, नाशिक,सांगलीत, कोल्हापुरात किती मुस्लमान आहेत तिथे, फक्त हारल्याचा नारळ कोणाच्या तरी डोक्यावर फोडायचे इथल्या हुशार हिंदूने तुमचा पराभव केलाय ,अयोध्येत तुमचा पराभव झाला आणि तरी तुम्ही मुस्लिमांना टार्गेट करता असा युक्तीवाद आव्हाडांनी विधानसभेत केला.
अर्थसंकल्पात मुस्लिम समाजाबद्दल एक योजना नाही, मुस्लिम आरक्षणाची अर्थसंकल्पात चर्चा नाही मग इतका द्वेष का तुमच्या मनात? शहरांसाठी तुम्ही काहीही दिलेले नाही तु्म्ही शेतकरी वर्गाला दिले त्यांचा आनंद आहेत पण मागची थकबाकी का माफ करत नाही शेतकऱ्यांची म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना मूर्ख समजता का? लोकसभेत शेतकऱ्यांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली असे म्हणत लोकसभा निकालावर आव्हाडांनी युतीसरकारवर टीका केली.