याला अनुमोदन आमदार राम कदम आणि आमदार प्रकाश सुर्वें यांनी दिले. दरवर्षी आम्ही आमच्या मतदारसंघातून अनेक तीर्थ क्षेत्रांना ज्येष्ठ नागरिकांना मोफत सुविधा पुरवतो अशे विधान सभागृहात कदम आणि सुर्वेंनी केले. हजच्या यात्रेसाठी अनुदान दिले जाते मग तीर्थक्षेत्रांसाठी का नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. वारीला जसे वीस हजारांचे अनुदान दिले आत आहे, तसेच यात्रेसाठी अनुदान द्या अशी मागणी विधानसभेत महायुतीच्या आमदारांकडून एकमताने करण्यात आली.
सीएम शिंदे काय म्हणाले..
विधानसभेत सीएम शिंदे यांनी सरनाईकांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार ”मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ लागू करणार आहोत. योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठांना सरकार काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी घेऊन जाणार आहे. अद्याप योजना कशी असेल विनाशुल्क असेल की शुल्करहित असा काही खुलासा करण्यात आलेला नाही. पण लवकरच योजना लागू करु अशी घोषणा शिंदेंनी केले त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ आणि गरीब असणाऱ्या वृद्धांना तीर्थक्षेत्राचे दर्शन करता येणार आहे.
महाराष्ट्राआधी दिल्ली, हरियाणा आणि मध्यप्रदेशमध्ये हीच योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा असेच नाव देण्यात आले आहे.