विधान परिषद ११ जागांसाठी निवडणूक
लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेचे ११ सदस्य २७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर १२ जुलै रोजी ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
ठाकरे गटाची उडी
संख्याबळानुसार महायुती विधान परिषदेच्या ९, तर महाविकास आघाडी २ जागा लढवणार असल्याचे संकेत यापूर्वी मिळत होते. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत मिळत होते. परंतु आता ठाकरे गटानेही निवडणुकीत उडी घेत ट्विस्ट निर्माण केला आहे.
आगे आगे देखो, होता है क्या
उद्धव ठाकरे लवकरच विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार आहेत. मतांची जुळवाजूळव पूर्ण झाली असून निवडणुकीत काय होतं पाहा, असं सूचक वक्तव्य ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याने केल्याची माहिती आहे. त्यामुळे परिषदेवरील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीनंतर आता ११ जागांची निवडणूकही रंगतदार होणार आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
बंडखोर आमदार संपर्कात
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून याआधीही करण्यात येत होता. आता १२ जुलैला होणाऱ्या गुप्त मतदान आणि लागोपाठच्या मतमोजणीत काय चमत्कार होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दुसरीकडे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून कोण रिंगणात उतरणार, हेही आता महत्त्वाचं आहे.