एरंडवणे-मुंढव्यातून रक्त नमुने तपासणीला
रुग्णांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, सर्वेक्षणामध्ये तापाची लक्षणे दिसून आलेले आणि गर्भवती महिलांचे रक्तनमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे. एरंडवणे परिसरातून आठ आणि मुंढव्यातून १६ रक्ताचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
७९ घरांमध्ये डासांच्या अळ्या
एरंडवणे परिसरातील दोन हजार ४२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ७९ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. मुंढवा परिसरातील एक हजार ५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ४९ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली.
किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता
मुंढव्यातील रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती खासगी रुग्णालय आणि प्रयोगशाळेने महापालिकेला वेळेत दिली नसल्याचेही समोर आले आहे. पावसाळा सुरू असल्याने किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांनी अशा रुग्णांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला द्यावी, असे पत्र शहरातील सर्व प्रयोगशाळा आणि रुग्णालयांना पाठविण्यात आले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणार
शहरात किटकजन्य आजांराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपायोजना करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यात येत असून, डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात येत आहे; तसेच संशयिताच्या रक्ताचे नुमने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात आले आहे.
– डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका