१. मान्सूनचा जोर वाढणार! पुढील काही तासात जोरदार
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, ठाणे, पालघर, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. समुद्रसपाटीवरील महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. २७ जून ते ३१ जून आणि १ जुलै रोजी कोकण, गोवा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…
२. विधानपरिषदेसाठी भाजपची चाचपणी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी पुढील महिन्यात (१२ जुलै) होणाऱ्या निवडणुकीत भाजपने चार ते पाच जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. यात लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले रावसाहेब दानवे आणि डॉ. भारती पवार यांच्या व्यतिरिक्त पक्षनेत्या पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच्याही नावांचा समावेश आहे. यातील दानवे, मुंडे व डॉ. पवार या तिघांपैकी एकाला राज्यसभेत रिक्त झालेल्या जागेवरही संधी मिळू शकते.
३. शिखर बँक प्रकरणात अजितदादा अडचणीत
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत एकटे पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी या प्रकरणी विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करत अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह बँकेच्या ८० संचालकांना क्लीन चिट दिली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवालाला विरोध करण्यासाठी सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला. पण आर्थिक गुन्हे शाखेनंही ईडीच्या अर्जाला विरोध केला. अधिक बातमी वाचा सविस्तर…
४. देवतळे दाम्पत्य काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी निलंबित
जिल्ह्यातील काँग्रेस नेते डॉ. विजय देवतळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. आसावरी देवतळे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
५. रामकृष्ण हरी! तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान
श्री. क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारीचा ३३९वा पालखी सोहळा २८ जून ते १७ जुलै कालावधीत साजरा होत आहे. त्या अनुषंगाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने सोयीसुविधांची तयारी पूर्ण झाली आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मुख्य मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी फुलांची सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…
६. दारुच्या नादात पाठ लाल, बाबा बदडून बदडून सोडवितोय दारु
एका मंदिरात गळ्यात हार घालून बसलेला बाबा दारू सोडवायच्या नावाखाली एका युवकाला बेदम बदडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा शिवारातील एका मंदिरावरचा असल्याची चर्चा आहे.
७. बिनभरवशाचं आयुष्य! कामावरून घरी जाताना काळाचा घाला
साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी (वय ३६) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. रात्रीची ड्युटी करुन घरी जात असताना आनंदखेडे गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेनं पोलीस दलातून शोक व्यक्त होत आहे.
८. करोना झाल्याचे भासवून वडिलांचा खून
‘करोना साथीरोगाच्या काळात वडिलांना करोना झाल्याचे भासवले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून तिथे जीवे मारले,’ असा आरोप लहान भावाने मोठ्या भावासह चुलत भावावर केला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नारायण बापू तेलोरे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
९. फायनल सामना विराट कोहली खेळणार की नाही?
टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनल लढतीसाठी आता दोन संघ ठरले आहेत. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकून फायनल फेरी गाठली तर भारताने इंग्लंडविरुद्ध सामना जिंकून फायनलमध्ये दमदार एंट्री घेतली. भारताने इंग्लंडला १०६ धावांवर सर्वबाद केले आणि सामना ६८ धावांनी जिंकला. भारतविरुद्ध इंग्लंड सामन्यातही विराट कोहली काही विषे पराक्रम दाखवू शकला नाही. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विराटच्या फॉर्मबद्दल वक्तव्य केले आहे.
१०. सईनं जपून ठेवलीय पहिल्या लग्नाची खास आठवण
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक मराठमोळ्या नावांचा बोलबाला दिसतोय. त्यापैकीच एक म्हणजे सई ताम्हणकर. सई अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. सोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही जोरदार चर्चा होताना दिसतेय. यात आता सईचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, यात ती तिच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलताना दिसतेय.